
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसाने सुमारे ५९ गावांत नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. गहू, कांदा, टोमॅटोसह आंबा, डाळिंब, द्राक्ष, लिंबू, पेरू या फळबागांचे नुकसान झाले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसापासून वातावरणात बदल झाला असून अनेक भागांत अवकाळी पाऊस, वादळ झाले. गारा पडल्या. त्याचा फटका शेतपिकांनी बसला आहे. बुधवारी व गुरुवारी अशा दोन दिवसांत झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ५९ गावांमधील ४ हजार ८९६ शेतकऱ्यांचे २ हजार ९४१.२० हेक्टर क्षेत्रातील गहू, कांदा, टोमॅटो, वाटाणा, भाजीपाला या पिकांसह आंबा, डाळिंब, द्राक्ष, लिंबू, पेरू या फळबागांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने उत्तर आणि दक्षिण भागाला तडाखा दिला. अवकाळी पावसाने व गारपिटीमुळे आंबा, द्राक्ष, संत्र्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे संत्रा व कापणीला आलेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कर्जत, पारनेर, राहुरी, नेवासे, नगर आणि अकोले तालुक्यांत जोरदार पावसासह गारपीट झाली.
नुकसान स्थिती अशी...
अहिल्यानगर तालुक्यातील दोन गावांमधील ३५ शेतकऱ्यांचे ९.४० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पारनेर तालुक्यातील ९ गावांमधील १ हजार ५८९ शेतकऱ्यांचे ९८६.३० हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. श्रीगोंदे तालुक्यातील १९ गावांमधील ४०२ शेतकऱ्यांचे २८२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. कर्जत तालुक्यातील ५ गावांना अवकाळीचा तडाखा बसला.
नऊ शेतकऱ्यांचे ४.५० हेक्टरचे नुकसान झाले. राहुरी १४ गावातील १ हजार ७०७ शेतकऱ्यांचे १हजार १९ हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. नेवासे तालुक्यातील दोन गावांतील ६८० शेतकऱ्यांचे ३८० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. अकोले तालुक्यातील ८ गावांमधील ४७४ शेतकऱ्यांचे २६० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. प्रशासन नुकसानीचे पंचनामे करत आहे असे सांगण्यात आले. संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीचे आकडे कळणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.