Pune News : चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा टायगर सफारीसाठी ओळखला जातो. येथे वाघ पाहण्यासाठी राज्यसह देश आणि विदेशातील पर्यटक हजेरी लावतात. सध्या येथे टायगर सफारीसाठी डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या वापरल्या जात आहे. यावर आता प्रशासनाने मोठा निर्णय घेताना, ताडोबा आणखीन ग्रीन करण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्यांना छेद देत इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग येथे केला जाणार आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जात असतानाच आता यात आणखी एका नव्या प्रयोगाची भर पडणार आहे. येथे देशातील पहिल्या प्रदूषण मुक्त व्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टीने काम केले जात आहे. आधीच निसर्गाच्या हिरव्यागार शालूने नटलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पास आणखी हिरवे आणि प्रदुषण मुक्त केले जाणार आहे.
येथे सध्या टायगर सफारीसाठी ताडोबात पेट्रोल वर चालणाऱ्या जिप्सी वापरल्या जातात. मात्र आता पेट्रोल वर चालणाऱ्या जिप्सी ऐवजी इलेक्ट्रिक जिप्सींचा वापर केला जाणार आहे. यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पास बॅटरीवर चालणाऱ्या तीन जिप्सी प्रयोगीय तत्वावर टायगर सफारीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
देशातील पहिलाच प्रयोग
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनाचा उपयोग होणार असून हा अख्या देशातील पहिलाच उपक्रम असणार आहे. असा प्रयोग देशातील कोणत्याच प्रकल्पात झालेला नाही. त्यामुळे ताडोबा परिसरील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
पशु-पक्ष्यांचा होणार मुक्त संचार
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घेतल्या गेलेल्या या तीनही जिप्सी गाड्या या बॅटरीवर चालणाऱ्या आहेत. यामुळे त्यांचा आवाज होत नाही. तसेच पुर्ण इलेक्ट्रिक असल्याने यामुळे ताडोबा परिसरातील प्रदूषणही कमी होईल. तर या जिप्सी गाड्यांना अजिबात आवाज नसल्याने अभयारण्यात पशु-पक्ष्यांना कोणताही त्रास होणार नाही. ज्यामुळे त्यांचा मुक्त संचार वाढेल. तर पर्यटकांचा याचा फायदा हा पशु-पक्ष्यांना जवळून पाहता येईल.
प्रदुषणाच्या नियंत्रणासह खर्च वाचणार
ताडोबाच्या सफारीत सध्या वापरात असणाऱ्या गाड्या या पेट्रोलवर चाळणाऱ्या आहेत. पण आता येथे इलेक्ट्रिक जिप्सी घेण्यात आल्या आहेत. याचा सगळ्यात मोठा फायदा हा पेट्रोलवर होणारा खर्च आणि त्यामुळे होणारे प्रदुषण थांबणार आहे. तर फक्त १५ रूपयांच्या चार्जिंगमध्ये एका सफारीचा आनंद लूटता येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.