Leopard Rescue : दोन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश

Leopard Terror : बस्ती सावरगाव व मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे वन विभागाने लावलेल्या दोन पिंजऱ्यांत दोन बिबटे जेरबंद झाले आहेत.
Leopard
LeopardAgrowon

Pune News : बस्ती सावरगाव व मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे वन विभागाने लावलेल्या दोन पिंजऱ्यांत दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. यापैकी एक पाच ते सहा वर्षे वयाचा नर, तर दुसरी मादी बिबट्या आहे. दोन्ही बिबट्यांना माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

मांजरवाडी येथील मोरे मळा येथील पांडुरंग मोरे यांच्या उसाच्या शेताजवळ ५ फेब्रुवारी रोजी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नर बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

Leopard
Leopard Cub : अखेर बिबट्याची १३ पिल्ले पोहोचली आईच्या कुशीत

बस्ती सावरगाव येथील तानाजी शेलार यांच्या उसाचा शेताजवळ २७ जानेवारीला पिंजरा लावला होता. मांजरवाडी व बस्ती सावरगाव परिसरात दोन्ही बिबट्यांनी अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले करून धुमाकूळ घातला होता.

Leopard
Leopard Attack : पाटणला बिबट्याच्या हल्ल्याने पशुधन धोक्यात

पिंजरा लावणे तसेच जेरबंद झाल्यानंतर बिबट्यांना सुरक्षितरीत्या माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्याच्या कामाचे नियोजन उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ, वारूळवाडीचे पोलिस पाटील, आपदा मित्र सुशांत भुजबळ, मांजरवाडीचे पोलिस पाटील सचिन टावरे, सरपंच संतोष मोरे, ग्रामसुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे, शंतनू डेरे, अमोल केसकर, शरद मुळे, तानाजी शेलार, गणेश शेलार, ओंकार गुंजाळ, रवी सावंत, गणेश गोरडे, प्रथमेश शेलार यांनी केले.

डेरे वस्तीजवळ बिबट्या आढळला

दरम्यान, आज सकाळी वारूळवाडी येथील डेरे वस्तीजवळ उसाच्या मळ्यात बिबट्या आढळून आला. पंधरा दिवसांपूर्वी या भागात एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे डेरे वस्ती येथे पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com