Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Guru Pournima Celebration: अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वतीने गुरुकुंज आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा महोत्सव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या महासमाधिस्थळी गुरुवारी (ता. १०) होणार आहे.
Gurupournima
GurupournimaAgrowon
Published on
Updated on

Amravati News: अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वतीने गुरुकुंज आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा महोत्सव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या महासमाधिस्थळी गुरुवारी (ता. १०) होणार आहे.

गुरुपौर्णिमेबाबत उत्सुकता वाढविण्याकरिता व भाविकांना गुरुतत्त्वाशी जोडण्यासाठी तसेच गुरूंना साक्षी ठेवून सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय हितासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या पवित्र पर्वावर सर्व गुरुदेव साधक, जिज्ञासू व धर्मप्रेमी यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Gurupournima
Shri Guru Paduka Darshan: हरिनामाच्या गजरात ‘श्री गुरु पादुका दर्शन’ सोहळ्याची भक्तिमय सांगता!

गुरुवारी (ता. १०) पहाटे ४ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे व सकाळी ५ ते ६ या वेळात सामुदायिक ध्यान व त्यावरील चिंतन प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ करणार आहेत.

सकाळी ८ ते ९ या वेळेत यावली शहीद येथील श्रीगुरुदेव सेवामंडळ खंजिरी भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. सकाळी ९ ते १० व १० ते ११ या वेळेत खुशबू कठाणे व निखिल मढावी यांचे अभंग गायन होणार आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत धनंजय लोहटे यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.

Gurupournima
Ashadhi Wari : बळीराजाला सुखी-समाधानी करण्यासाठी आशीर्वाद द्यावा

दुपारी १२ ते १ ज्ञानेश्वरी दीदी या गुरुमहिमा या विषयावर प्रवचन सादर करतील. दुपारी १ ते २ या वेळेत विवेक गावंडे यांचे अभंग गायन होईल. दुपारी २ ते ३ शिल्पा पाटील यांचा भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ ते ४ डॉ. प्रशांत ठाकरे गुरू माहात्म्य या विषयावर प्रवचन सादर करतील.

दुपारी ४ ते ६ या वेळेत बाळासाहेब वाईकर अभंग गायन सादर करतील. सायं. ७ ते ७.३० सामुदायिक प्रार्थना व त्यावरील चिंतन ॲड. दिलीप कोहळे हे करतील. सायंकाळी ७.३० वाजता महाआरती व जयघोषाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com