Dr. Swati Khartode
Dr. Swati KhartodeAgrowon

Human Cell Growth : पेशीवाढीसाठी किवीपेक्षा पेरूच भारी

Guava Benefits : डेंगी, चिकुनगुनिया आणि अन्य साथीच्या आजारांत कमी झालेल्या रक्तातील पेशी वाढविण्यासाठी हिरव्या किवी फळापेक्षा ‘पेरू’च जास्त उपयोगी ठरल्याचे तुलनात्मक संशोधनातून सिद्ध झाले आहे.
Published on

Pune News : डेंगी, चिकुनगुनिया आणि अन्य साथीच्या आजारांत कमी झालेल्या रक्तातील पेशी वाढविण्यासाठी हिरव्या किवी फळापेक्षा ‘पेरू’च जास्त उपयोगी ठरल्याचे तुलनात्मक संशोधनातून सिद्ध झाले आहे. सुमारे १०० रुग्णांवर केलेले हे संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड ॲण्ड न्यूट्रिशनल सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आहारतज्ज्ञ आणि संशोधक डॉ. स्वाती खारतोडे यांनी हा तुलनात्मक अभ्यास केला आहे. डॉ. खारतोडे म्हणाल्या, ‘‘कोणत्याही विषाणूजन्य आजारांमध्ये फळांचे खूप महत्त्व असते. क-जीवनसत्त्व हे पेशी वाढविण्यामध्ये महत्त्वाचे असते. साथीच्या आजारांमध्ये पेशी कमी झाल्यावर बरेचसे डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञ देखील किवी खाण्याचा सल्ला देतात, मात्र किवी हे फळ खूप महाग असते म्हणून सर्वांनाच परवडते असे नाही.’’

Dr. Swati Khartode
Farmers Debt relief : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत माहिती चुकल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा

किवीपेक्षा कितीतरी जास्त पटीने ‘पेरू’ आणि ‘आवळा’ यामध्ये ‘जीवनसत्त्व क’ असते. परंतु आवळा ठरावीक काळामध्येच मिळतो म्हणून आम्ही डेंगी आणि चिकुनगुनिया रुग्णांमध्ये पेशी वाढविण्यासाठी किवी आणि पेरू यांच्या प्रभावाचे तुलनात्मक संशोधन केले. विषाणुजन्य आजारांमध्ये पेशी वाढविण्यासाठी किवीपेक्षा पेरू (पांढरा आणि गुलाबी गर असलेले दोन्ही) खाल्ल्यास पेशी लवकर वाढतात आणि रुग्ण लवकर बरे होतात. त्यामुळे डेंगी, चिकुनगुनियामध्ये किवी फळापेक्षा पेरू चांगले आहे, हे या संशोधनामधून सिद्ध होते, असा निष्कर्ष या संशोधनामधून निघाला आहे’’.

Dr. Swati Khartode
Heavy Rain : माथेरानमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस

असे झाले संशोधन

डेंगीमुळे पेशी कमी झालेले १०० रुग्ण निवडले ५० रुग्णांना हिरवे किवी फळ, तर ५० रुग्णांना पांढरा गर असलेले पेरू खाण्यास सांगितले. रोज त्यांच्या रक्तातील पेंशीची संख्या तपासण्यात आली संशोधनात सर्व वयोगटांतील रुग्णजवळपास सर्वच रुग्णांना एकसारखी औषधे चालू होती आहारही जवळपास एकसारखाच मिळालेल्या निरीक्षणांचे तुलनात्मक सांख्यिकीय विश्‍लेषण केले.

आहारात पेरू घेणाऱ्या रुग्णांच्या गटामध्ये पेशींच्या संख्यांची वाढती प्रवृत्ती दिसत होती, तर किवी गटामध्ये पेशी वाढण्याची प्रथम कमी प्रवृत्ती, नंतर वाढण्याची प्रवृत्ती आणि पुन्हा कमी होण्याची प्रवृत्ती होती. म्हणजेच पेशी वाढण्यामध्ये अनियमितता होती. म्हणूनच किवी गटाच्या रुग्णांचा रुग्णालयात डिस्चार्जदेखील उशिरा झाला. त्याउलट पेरू गटामधील रुग्णांच्या पेशी लवकर वाढल्यामुळे डिस्चार्ज तुलनेने लवकर झाला.
डॉ. स्वाती खारतोडे, आहारतज्ज्ञ आणि संशोधक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com