
Hasan Mushrif VS Satej Patil : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आजरा सहकारी साखर कारखान्यात हसन मुश्रीफ गटाने बाजी मारली आहे. करवीर पंचायतसमितीच्या सभागृहात सुरू असलेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतमोजणी सकाळपासून सुरु आहे.
दोन टप्प्यात झालेल्या मतमोजणीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या रवळनाथ विकास आघाडीने १९ जागा जिंकत कारखान्यावर सत्ता काबीज केली आहे. तर सतेज पाटील गटाला ब वर्गातील केवळ एक जागा मिळवता आली आहे. निवडणुकीआधीच सतेज पाटील गटाचे शिवसेनेचे संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती.
३२ हजार ७३९ सभासद असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी ४६ उमेदवार रिगणात उभे होते. यामध्ये रविवारी झालेल्या मतदानात १९८६६ मतदारांनी मतदान केले होते. मागच्या दोन महिन्यांपासून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नेते प्रयत्नशील होते. मात्र याला यश आले नाही.
यानंतर अचानकपणेच राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाने पालकमंत्री हसन मुश्रीफ पुन्हा निवडणूक लढवण्याचे ठरवले. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढलेले मंत्री हसन मुश्रीफ-आमदार सतेज पाटील हे आजरा कारखाना निवडणुकीवेळी मात्र एकमेकांविरोधात लढताना दिसले.
आजरा साखर कारखान्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला होता. ४५ टेबलांवर दोन फेरीत मतमोजणीला सुरूवात झाली पहिल्या टप्प्यातच निकाल स्पष्ट झाल्याने मुश्रीफ गटाकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत होता. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुजयकुमार येजरे, अमित गराडे यांनी काम पाहिले.
निवडून आलेले उमेदवार असे
उत्तुर - मडिलगे गट
मारुती घोरपडे -८५६५, दीपक देसाई - ८४९८, वसंतराव धुरे - ८७५३
मुकुंद देसाई - ८६९१, सुभाष देसाई - ८२३१, शिवाजी नांदवडेकर - ८०४०
पेरणोली - गवसे
रणजीत देसाई - ८६९३, गोविंद पाटील - ८३५१, उदय पोवार - ८५५५
भादवण - गजरगाव
राजेश जोशीलकर - ८७६०, मधुकर देसाई - ८८००, राजेंद्र मुरुकटे - ८१९९ विष्णू केसरकर -८९२६, संभाजी पाटील - ८७८८, अनिल फडके - ८५२४
महिला राखीव गट
मनीषा देसाई - १०२४६, रचना होलम - ९८७०
अनुसूचित जाती - जमाती प्रतिनिधी
हरी कांबळे - १०३५६
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
काशिनाथ तेली - ९८२३
ब वर्ग अनुत्पादक गट
अशोक तरडेकर - १३८४. नामदेव नार्वेकर - १३८०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.