
Ajara Sugar Factory Election : चंदगड तालुक्यातील आजरा सहकारी साखर कारखाना लि. गवसे या कारखान्यासाठी मतदान झाले. या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ६०.६८ टक्के मतदान झाले. दरम्यान मतदानादरम्यान मडिलगे केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार घडल्याच्या संशयावरून गोंधळ झाला. हा प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. काही केंद्रावर मतदान नेण्यावरून आघाडीचे कार्यकर्ते व उमेदवारामध्ये बाचाबाची झाली.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात कंबर कसली होती. दरम्यान उद्या होणाऱ्या मतमोजणीवेळी सभासद कोणाला कौल देणार याबाबत उत्सुकता लागली आहे. या कारखान्याच्या निवडणुकीवरून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांबाबत मोर्चेबांधणी होणार असल्याचे बोलले जात आहे.
२५ हजार १८१ इतके अ वर्ग तर ७ हजार ६०३ इतके व वर्ग सभासद असे मिळून एकूण ३२ हजार ७८४ इतके सभासद आहेत. यापैकी १९ हजार ८६६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वात जास्त इटे येथील मतदान केंद्रावर ७९.८६ इतके मतदान झाले, तर भादवण येथील केंद्र क्रमांक ६३ वर ५७. ६६ इतके मतदान झाले.
गतवेळाच्या तुलनेने यावेळी कारखान्याच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला आहे. गतवर्षीं सुमारे ७० टक्केच्यावर मतदान झालेले आहे. हा घसरलेला टक्का कुणाला तारणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. मंगळवार (ता. १९) आजरा येथे पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ८ वाजता मतमोजणी आहे.
कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजप काँग्रेस शिवसेना शिंदे व ठाकरे गट यांची चाळोबादेव शेतकरी विकास आघाडी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी मिळून रवळनाथ शेतकरी विकास आघाडी रिंगणात होतो. निवडणुकीच्या निमित्ताने गेले पंधरा दिवस तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या होत्या. कारखान्याच्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. २० जागांसाठी ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
सकाळच्या पहिल्या तासभरात निवडणूक मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. १०: नंतर मतदानाचा टक्का वाढला. दुपारच्या सत्रातही मतदानाची प्रक्रिया संथगतीने होती. सायंकाळी परत मतदानाचा वेग वाढला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.