Group Farming : गटशेतीतून इराणला केळी निर्यात

Banana Export : रांजणीची केळी थेट इराणला निर्यात होत आहे. यातून ५० एकरांवर १५०० टनांहून अधिक उत्पादन मिळण्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला
Banana Net for banana exports
Banana Net for banana exports
Published on
Updated on

Pune News : रांजणी (ता. आंबेगाव) येथील ३० शेतकऱ्यांनी एकत्र येत ५० एकरांवर केळी लागवड आणि यशस्वी निर्यात केली आहे. केळीच्या पहिल्या तोड्याला प्रति किलो २३.५० दर मिळाला असून, रांजणीची केळी थेट इराणला निर्यात होत आहे. यातून ५० एकरांवर १५०० टनांहून अधिक उत्पादन मिळण्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, सध्याच्या बाजारभावानुसार तीन कोटींहून अधिक उत्पन्न मिळणार आहे.

Banana Net for banana exports
Banana Export : खानदेशातून परदेशात ८०० कंटेनर केळी निर्यात

आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यांमध्ये मुख्य पीक म्हणून ऊस, कांदा, बटाटा या पिकांची ओळख आहे, परंतु येत्या काही वर्षांतील या पिकांच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या केळीच्या सामूहिक शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखविला आहे. रांजणी येथील शेतकऱ्यांनी गट करून अभ्यास दौरा करत जळगावसह इंदापूर तालुक्यातील टेंभुर्णी, अकलूज येथील केळी शेतीला भेटी देऊन माहिती घेतली तसेच विविध केळी निर्यात केंद्र व कोल्ड स्टोअरेजची पाहणी करून निर्यातीची प्रक्रिया समजून घेतली आणि केळी लागवडीचा निर्णय घेतला.

Banana Net for banana exports
अत्याधुनिक पॅकहाउसद्वारे केळी निर्यात

केळी लागवड करताना गटातील शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक पिकातील निम्मे क्षेत्र केळी लागवडीसाठी वापरले. त्यानुसार शेतकरी श्याम भोर, सतीश वाघ, पांडुरंग निकम, सूर्यकांत वाघ, अजित धुमाळ, ज्ञानेश्वर निकम, निवृत्ती निकम, विठ्ठल निकम, किशोर निकम, नीलेश भोर, तुकाराम वाघ, नारायण वाघ यांच्यासह एकूण ३० शेतकऱ्यांनी ५० एकर क्षेत्रांवर जानेवारीमध्ये केळीची ठिबक सिंचनावर लागवड करून निर्यातक्षम उत्पादन घेतले. पहिल्याच प्रयत्नात केळी इराकला निर्यात झाली असून, यासाठी २३.५० रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे.

पिकांच्या दरातील अनिश्‍चिततेमुळे पीकबदल करून केळीचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच केळीचे उत्पादन घेत असल्याने अनुभव कमी असल्याने निम्मे क्षेत्रच लागवडीसाठी वापरले. सध्या माझे चार एकरांवर केळी पीक असून, पहिल्या तोड्यातच ३६ टन मालाचे उत्पन्न मिळाले असून अजून पुढील काही तोड्यात ८० टनांपर्यंत असे एकूण ११६ टन उत्पादन मिळण्याचा विश्वास आहे. सध्याच्या बाजारभावानुसार प्रति किलो २३ रुपये ५० पैसे रुपये भाव मिळत आहे. हा दर किफायतशीर आहे.
- श्याम भोर, रांजणी, ता. आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com