Groundnut Cultivation : नगदी पिकामुळे भुईमूग लागवडीकडे कल

Groundnut Farming : नगदी पिकामुळे उत्‍पन्नात वाढ होऊ लागल्‍याने महाडमधील शेतकरी भुईमूग लागवडीकडे वळू लागले आहेत. तालुक्यात सुमारे शंभर एकर क्षेत्रावर भुईमूग लागवड करण्यात आली आहे.
Groundnut Farming
Groundnut FarmingAgrowon
Published on
Updated on

Raigad News : नगदी पिकामुळे उत्‍पन्नात वाढ होऊ लागल्‍याने महाडमधील शेतकरी भुईमूग लागवडीकडे वळू लागले आहेत. तालुक्यात सुमारे शंभर एकर क्षेत्रावर भुईमूग लागवड करण्यात आली आहे. सध्या भुईमूग काढणीच्या कामाला वेग आला असून भुईमुगामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होण्याची शक्‍यता आहे.

महाड तालुक्यामध्ये केवळ वरंध या गावांमध्ये यापूर्वी भुईमुगाची लागवड केली जायची. या गावातील घरटी एक शेतकरी तरी भुईमुगाची लागवड करीत असल्याने या गावाला भुईमुगाचे गाव अशीही ओळख मिळाली आहे.

वरंध गावाचा आदर्श घेत तालुक्यातील इतर शेतकरीही भुईमूग लागवड करण्याकडे वळू लागले आहेत. नगदी पीक असल्याने तसेच त्यापासून तेलाची निर्मिती व पेंड मिळत असल्याने भुईमुगापासून कोणताही भाग व्यर्थ जात नाही.

Groundnut Farming
Groundnut Harvesting: भुईमूग पीक काढणीवेळी घ्यावयाची काळजी

शेंगदाणा तेल २०० ते २५० रुपये लिटर व शेंगदाणा २०० रुपये किलो या दराने बाजारपेठेत मिळतो. त्यामुळे चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून भुईमुगाला पसंती मिळते. जिल्हा परिषदेकडूनदेखील भुईमूग बियाणे खरेदीसाठी ५० टक्के अनुदान दिले जात असल्याने शेतकऱ्यांचा कल भुईमूग लागवडीकडे वळू लागला आहे.

Groundnut Farming
Groundnut Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे भुईमुगाचे नुकसान

महाड तालुक्यामध्ये वरंध गावाव्यतिरिक्त बारसगाव, गावडी तसेच तालुक्यातील कुंभे शिवथर, पडवी, आसनपोई, विन्हेरे व वलंग येथील शेतकऱ्यांनी शंभर एकर क्षेत्रावर भुईमूग लागवड केली आहे.

८० शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटपही करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये भुईमुगाची लागवड करण्यात आली असून काढणीच्या कामाला वेग आला आहे. सिंचन क्षेत्रात भुईमुगाची लागवड होत असल्याने धरणालगतचे शेतकरी याकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com