Groundnut Harvesting: भुईमूग पीक काढणीवेळी घ्यावयाची काळजी

Groundnut Farming: सध्या भुईमूग पीक काढणीच्या अवस्थेत आहे. योग्य पक्वतेची ओळख, वेळेवर काढणी, योग्य साठवणूक आणि जनावरांसाठी पाला वापरताना दक्षता महत्त्वाची ठरते.
Groundnut
GroundnutAgrowon
Published on
Updated on

डॉ. मंजूषा गायकवाड

Crop Harvesting Tips:

सध्या भुईमूग पीक पक्वता आणि काढणीच्या अवस्थेत आहेत. शेंगा पक्व झाल्यानंतर भुईमुगाची पान पिवळी पडतात. पानगळ सुरू होते. पक्वता किती आहे, हे पाहण्यासाठी भुईमूग उपटून पाहावा. पक्व झाल्यानंतर शेंगांचे टरफल टणक होते.

जातीनुसार टरफल आतून काळे पडते. शेंगदाण्याचा रंगही बदलतो. एका झाडावरील सरासरी ७५ टक्के शेंगा पक्व झाल्यास भुईमूग काढणीस आल्याचे समजावे. अशा स्थितीमध्ये पिकाची काढणी काळजीपूर्वक केली पाहिजे.

सध्या अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामध्ये शेतात पाणी साचण्याची स्थिती निर्माण होऊन पीक काढणीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

भुईमूग काढणीच्या काळात जमिनीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ओल राहिल्यास शेंगांना जागेवरच मोड येतात. यामुळे अनेक वेळा ५० टक्क्यांपर्यंतही नुकसान झाल्याची नोंद आहे.

Groundnut
Groundnut Yield Drop : भुईमूग उत्पादनाला तापमान वाढीचा फटका

भुईमूग काढणीच्या वेळी भुईमूग झाड उपटणे आणि शेंगांची तोडणी करणे ही महत्त्वाची कामे असतात. काढणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. जमीन फार टणक असल्यास बैलचलित यंत्राचा वापर करावा.

काढणी केलेल्या शेंगांचा ढीग करून ठेवू नयेत. शेंगा जमिनीवर कमी जाडीच्या थर पसरून उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात. शेंगांमधील पाण्याचे प्रमाण ७ टक्क्यांपर्यत आल्यानंतर सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

Groundnut
Groundnut Harvesting : भुईमूग काढणीला सुरुवात

दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण नऊ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास अस्पर्जिलस नावाच्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे ‘अफ्लाटॉक्सिन’ या विषारी घटकाची निर्मिती होते. यामुळे बियाण्याची उगवणक्षमता कमी होते. असे प्रादुर्भाव झालेले दाणे खाण्यात आल्यास विषबाधा होऊ शकते.

शेंगाची साठवणूक करीत असताना साठवणुकीची खोली किंवा कोठी स्वच्छ असावी. आतल्या बाजूस पांढरा रंग किंवा चुना देऊन घ्यावा. त्यामुळे त्या कोठारामध्ये साठवणुकीतील किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी होते. कोठारामध्ये शेंगा ठेवताना पोत्यामध्ये भरून ठेवाव्यात. दीर्घकाळ साठवणार असाल तर प्रत्येक महिन्यात एकदा त्याची तपासणी करावी.

भुईमुगाच्या पाला जनावरांचे उत्तम खाद्य आहे. मात्र, पशुखाद्य म्हणून पाला वापरताना तो भिजणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा पाल्यात ओलाव्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. असा पाला खाण्यात आल्यास जनावरे आजारी पडू शकतात. भुईमुगाचा पाला उन्हात चांगला वाळवून योग्य प्रकारे साठवून ठेवावा. त्यानंतरच जनावरांना खाऊ घालावा.

- डॉ. मंजूषा गायकवाड, ९६५७७ २५८३३

(पीक संरक्षण तज्ज्ञ, तेलबिया संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com