Grape Export : राज्यातून द्राक्ष निर्यात सुरू

यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यातीला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्यातून आखाती देशात २० कंटेनर म्हणजे ३१६ टन इतकी द्राक्षाची निर्यात झाली आहे.
Grape Export
Grape ExportAgrowon
Published on
Updated on

सांगली ः यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यातीला (Grape Export) डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्यातून आखाती देशात २० कंटेनर म्हणजे ३१६ टन इतकी द्राक्षाची निर्यात झाली आहे.

तर राज्यातून ६८४ टन इतक्या द्राक्षाची निर्यात झाली आहे. जिल्ह्यातून जानेवारीच्या अखेरपासून युरोप देशात द्राक्षाची निर्यात सुरू होईल, अशी माहिती कृषी विभागाने (Agriculture Department) दिली आहे.

Grape Export
Grape Rate : यंदा द्राक्षाच्या दरात अपेक्षित सुधारणा

जिल्‍ह्यातून यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी अधिक होण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

यंदा १६ हजार शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९ हजार ४३१ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा जिल्‍ह्यातून द्राक्षाची निर्यात वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यातील ४० हजार ९४५ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. राज्यातून युरोपसह आखाती देशात दरवर्षी द्राक्षाची निर्यात होते. यंदा हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी, द्राक्षाची निर्यातीला विलंब झाला आहे.

जानेवारीअखेरीस निर्यातीला गती

सध्या राज्यातील नाशिक, सांगली या जिल्ह्यांतून आखाती देशात द्राक्षाची निर्यात होवू लागली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस निर्यातीला गती येणार आहे.

Grape Export
Grape Rate : द्राक्षाच्या दरात १५ टक्क्यांनी घसरण

द्राक्ष निर्यातीसाठी ४० हजार शेतकऱ्यांची नोंदणी

महाराष्ट्र आणि कर्नाटकातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीसाठी ४१०२५ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील ४० हजार ९४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून कर्नाटकातील ८० शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी पुढे आले आहेत.

सध्या महाराष्ट्रातून नेदरलॅन्ड, लाटव्हिया, रोमानिया, स्वीडन या देशात द्राक्षाची निर्यात सुरू झाली आहे. आतापर्यंत ५३ कंटनेर म्हणजे ६८४.४७९ टन द्राक्षाची निर्यात झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

राज्यातील निर्यात दृष्टिक्षेपात

देश.... कंटेनर...टन

नेदरलॅन्ड....४७...६०३.७७८

लाटव्हिया...२...२७.८५०

रोमानिया...२...२६.८५०

स्वीडन...२...२६.०००

एकूण...५३...६८४.४७८

जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात आखाती देशात सुरू झाली आहे. येत्या काळात द्राक्ष निर्यातीस गती येईल. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे आले असल्याने निर्यातही वाढेल.

- प्रकाश नागरगोजे, कृषी अधिकारी (निर्यात) सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com