Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon

Irrigation Subsidy : परभणीत ‘ठिबक’, ‘तुषार’ संचाचे पावणेतेरा कोटींचे अनुदान प्रलंबित

Micro Irrigation : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील (पीएमएसकेवाय) सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत ठिबक व तुषार संच अनुदानासाठी अर्ज केलेल्यापैकी ३ हजार ६२ लाभार्थी शेतकऱ्यांना ५ कोटी ९ लाख ११ हजार ११३ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.
Published on

अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News : परभणी ः परभणी जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील (पीएमएसकेवाय) सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत ठिबक व तुषार संच अनुदानासाठी अर्ज केलेल्यापैकी ३ हजार ६२ लाभार्थी शेतकऱ्यांना ५ कोटी ९ लाख ११ हजार ११३ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

परंतु अद्याप ६ हजार ९२७ शेतकऱ्यांचे १२ कोटी ७५ लाख २ हजार ३९० रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. निधीची मागणी करण्यात आली. परंतु अनेक महिन्यांपासून निधी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : ‘ठिबक, तुषार’चे ९ कोटी अनुदान प्रलंबित

पंतप्रधान कृषी सिंचन योजना (पर ड्रॉप मोअर क्रॉप) सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत ठिबक व तुषार संच खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आलेल्या अर्जांतून सोडत पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते. याअंतर्गत २०२३-२४ या वर्षी अनुदानासाठी सोडत काढून जिल्ह्यातील २१ हजार २३२ शेतकऱ्यांच्या अर्जांची निवड करण्यात आली होती.

पडताळणीनंतर ७ हजार २८६ अर्ज अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत आहेत. पूर्वसंमती दिलेल्या अर्जांची संख्या ७ हजार २० असून त्यापैकी ६ हजार ९८० शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार संच खरेदीबाबतची कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केली आहेत. त्यापैकी ६ हजार ९२७ शेतकऱ्यांच्या पडताळणीनंतर त्यांना अनुदान वितरित करण्यास संमती देण्यात आली.

२०२३-२४ मध्ये ३ हजार ०६२ शेतकऱ्यांना ५ कोटी ९ लाख ११ हजार ११३ रुपये अनुदान वितरित केले आहे. २०२२-२३ मध्ये ६ हजार ९२९ शेतकऱ्यांना १२ कोटी २९ लाख २६ हजार २३४ रुपये व २०२१-२२ मध्ये ८ हजार ४८६ शेतकऱ्यांना १५ कोटी १४ लाख ९७ हजार ६५६ रुपये असे ३ वर्षांत एकूण १८ हजार ४७७ शेतकऱ्यांना ३२ कोटी ५३ लाख ३५ हजारांचे अनुदान वितरित केले, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com