Agriculture Department : पूर्व संमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच दिल्यास अनुदान नाही

National Agricultural Development Scheme : राष्ट्रीय कृषी विकास योजनेची २०२४-२५ वर्षात अंमलबजावणी करताना जिल्हा कृषी खात्याने वितरकांना स्पष्ट निर्देश देत पूर्व संमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच दिल्यास मोका तपासणी होणार नाही.
Micro Irrigation
Micro IrrigationAgrowon
Published on
Updated on

Buldana News : राष्ट्रीय कृषी विकास योजनेची २०२४-२५ वर्षात अंमलबजावणी करताना जिल्हा कृषी खात्याने वितरकांना स्पष्ट निर्देश देत पूर्व संमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच दिल्यास मोका तपासणी होणार नाही, असे कळविण्यात आले आहे. तर दुसरीकडे शासनाकडून महिनोमहिने पूर्वसंमत्या सध्या दिल्या जात नसल्याने शेतकऱ्यांनी किती महिने प्रतीक्षा करीत थांबावे. याचा आगामी काळात सूक्ष्म संच विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता विक्रेते व्यक्त करू लागले आहेत.

आयुक्तालयातील फलोत्पादन संचालकांच्या पत्राचा संदर्भ देत कृषी विभागाने बुधवारी (ता. २३) जिल्ह्यातील वितरकांना सूचना करणारे पत्र काढले आहे. यामध्ये उत्पादक कंपनीने नेमलेल्या वितरकाने फक्त कंपनीकडून घेतलेल्या साहित्याचा पुरवठा शेतकऱ्यास करावा, इतर वितरकांकडून खरेदी केलेले सूक्ष्म सिंचन साहित्य अनुदानास पात्र राहणार नाही. वितरकाने एका कंपनीची नोंदणी करून सदर कंपनीचे काम त्याच वर्षात बंद केल्यास व दुसऱ्या वर्षी अन्य कंपनीचे काम केल्यास (तशी वितरक नोंदणी झाल्यास) वितरकास यापूर्वी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना साहित्य पुरवठा केल्यापासून तीन वर्षाच्या कालावधीपर्यंत विक्री पश्‍चात सेवा देणे बंधनकारक आहे.

Micro Irrigation
Micro Irrigation Subsidy : सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी ‘महाडीबीटी’त सुधारणा करा

वितरकाने कोणत्याही परिस्थितीत पूर्वसंमतीपूर्वी सूक्ष्म संच सिंचन साहित्य शेतकऱ्यांना वितरित करून त्याचे देयक महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यासाठी शेतकऱ्यांना देऊ नये. तसेच अशा प्रकरणी शेतकऱ्यास अनुदान मिळेल याची हमीही देऊ नये. असे आढळल्यास पूर्वसंमतीपूर्वी खरेदी केलेल्या सूक्ष्म सिंचन संचाची मोका तपासणी करण्यात येणार नाही. वितरकाकडून मार्गदर्शक सूचनेचा भंग झाल्या कारणाने नोंदणी रद्द करण्याच्या कार्यवाहीमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्यास त्यास वितरकच जबाबदार धरण्यात येईल. शेतकऱ्याची अनुदान रक्कम संबंधित वितरकाकडून वसुल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Micro Irrigation
Micro Irrigation Subsidy : ‘सूक्ष्म सिंचन’चे २१० कोटी अनुदान थकित

शिवाय विक्रेत्याने संबंधित साहित्याचा बॅच क्रमांक, कंपनीचा बीआयएस नंबर, सीएमएल नंबर व ब्रँच नंबर संचाच्या देयकानुसार तपासणी अहवालात नोंदवणे अनिवार्य आहे. वितरकाने सूक्ष्म सिंचन साहित्य घटकांचा त्रैमासिक तपशिल सादर करावा, नोंदवही परिशिष्टावर शिल्लक सूक्ष्म सिंचन साहित्य संबंधित वितरकाच्या दालनात किंवा गोदामात उपलब्ध असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तांत्रिक आराखडा तयार करताना प्रतिनिधीने शेतकऱ्याच्या शेतावर स्वतः हजर राहून सूक्ष्म सिंचन आराखडा तयार करावा, अशा प्रकारच्या अनेक सूचना या पत्रात केलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास संबंधित वितरकास कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

वितरक म्हणतात, शेतकऱ्यांचे नुकसान

पूर्वसंमतीशिवाय साहित्य दिले असल्यास मोका तपासणी होणार नाही, असे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिक होईल. हंगामाच्या दृष्टीने शेतकरी वेळेवर संच खरेदी करीत असतात. या काळात ते पूर्वसंमतीची प्रतीक्षा करीत थांबले तर त्यांचा हंगाम निघून जाईल व नुकसानही होईल. त्यामुळे या जाचक अटीबाबत प्रशासनाने दिलासादायक पर्याय काढावा किंवा वेळच्यावेळी पूर्वसंमत्या देण्याचे काम वेगाने झाल्यास शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकेल, असेही वितरकांकडून सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Agrowon
agrowon.esakal.com