
Beed News : ग्रामदूत हा गावातील पाणलोटचा कणा आहे. ग्रामदूतानी गावांमध्ये जाऊन आपल्या गावातील पाणलोट क्षेत्र वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्रिपुरा सरकारचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग, पर्यटन विभागाचे सचिव किरण गित्ते यांनी व्यक्त केली.
मानवलोक अंबाजोगाई व विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटी परळी वैजनाथ, ग्राम सुराज्य फाउंडेशन आणि जल साक्षरता केंद्र मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रामदूत जलसाक्षरता प्रशिक्षण वर्ग १७ व १८ मार्चला स्थानिक मानवलोक संस्थेत पार पडला. त्याचे उद्घाटक म्हणून श्री. गित्ते बोलत होते. या वेळी विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा उषा किरण गित्ते यांचीही उपस्थिती होती.
या वेळी श्री. गिते यांनी महाराष्ट्रातील पाणलोट चळवळमधील सीएसआरचे योगदान आणि ग्रामीण पातळीवरील विकासामधील स्वयंसेवी संस्थांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लालासाहेब आगळे यांनी गावातील पाणलोट चळवळ आणि गाव विकास कसा केला जातो तसेच पाणलोट चळवळीच्या माध्यमातून गावातील लोकांना जलसाक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे.
जल साक्षर झालेल्या लोकांनी पाणलोट विकासमध्ये आपले योगदान देणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्गास ग्रामसुराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासह संभाजीनगर, जालना, लातूर जिल्ह्याचे गाव प्रतिनिधी उपस्थित आहेत.
यामध्ये लालासाहेब आगळे डॉ. श्रीनिवास वडपाळकर, डॉ. सोमीनाथ घोळवे, प्रकाश गडदे, समीर पठाण यांनी आपापल्या विषयावर मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी डॉ. सुहास आजगावकर यांनी गाव पातळीवरील पाण्याचे नियोजन व महिलाचे प्रश्न याविषयी तसेच त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश जाधव यांनी एकूण पाणलोट विकास साधायचा असेल, तर ग्राम चळवळ केली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.