Rural Development : करूयात, आरोग्यदायी गाव

Article by Sumant Deshpande : सरपंचाने आपल्या कार्यकाळात किमान एक तरी अद्वितीय काम करून दाखवल्यास पुढच्या पिढीसाठी ते दिशादर्शक आणि स्मरणीय ठरेल.
Shaley Poshan Aahar
Shaley Poshan AaharAgrowon

डॉ. सुमंत पांडे

लोकनियुक्त असो,अथवा पंचायत सदस्यातून निवड झालेला असो सरपंच हा त्या गावचा प्रथम नागरिक असतो. पाच वर्ष कालावधीसाठी विश्वस्त असतो. सरपंचाने केलेल्या कामाचा ठसा हा अढळ आणि स्मरणीय नक्कीच असतो. म्हणून सरपंचाने आपल्या कार्यकाळात किमान एक तरी अद्वितीय काम करून दाखवल्यास पुढच्या पिढीसाठी ते दिशादर्शक आणि स्मरणीय ठरेल.

गावाच्या गरजांचे नेमके आकलन करणे हे कौशल्याचे काम नक्कीच आहे. तथापि गावाची नस माहिती असलेले बहुतेक सर्व अनुभवी आणि चतुर लोक यांच्याकडेच गावाचा कारभार लोक देतात हे सर्वश्रुत आहे. त्यांना या समस्यांची उकल काय आहे हे देखील माहिती असते. फक्त निधी, योजना, आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी यासाठी त्यांच्या क्षमता विकसित करणे ही त्यांची वैचारिक गरज असते.

शिकण्याची प्रक्रिया

प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कामे केलेल्या गावांना भेटी देवून तेथे केलेल्या कामाची पाहणी, त्यातील लोकांचा आणि प्रशासनाचा सहभाग कसा होता याची प्रत्यक्ष खातर जमा केल्यास त्यांच्या मानतील संभ्रम दूर होऊन आपल्या गावासाठी त्याचा कसा वापर करत येईल या बाबत स्पष्टता येते.

Shaley Poshan Aahar
Rural Development : ग्रामपंचायतीकडे असावा शाश्‍वत धोरणात्मक आराखडा

विकासाच्या मुद्द्यांच्या प्राधान्य क्रम

विकासाची परिभाषा स्पष्ट होणे आधी महत्त्वाचे ठरते. आवश्यक त्या पायाभूत सुविधा या आवश्यकच आहेत तथापि, केवळ रस्ते,पेव्हिंग ब्लॉक,अथवा इतर बांधकामे करणे म्हणजे संतुलित विकास नव्हे. काही गावांतून सुमारे १५ ते २० वर्षापूर्वी उभारण्यात आलेली दुकान गाळे आणि तत्सम आज अनुपयुक्त ठरतात.

म्हणून विकासाचा प्राधान्य क्रम ठरविताना खालील बाबींचा खोलवर आणि सर्वांगीण विचार होणे अपरिहार्य आहे. ज्यामध्ये मानवी संसाधनांचा विकास,आरोग्य आणि पोषण,पिण्याचे पाणी,सांडपाणी आणि स्वच्छता,आवश्यक त्या सुविधा, कृषी,सिंचन,आणि पर्यावरण आणि सामाजिक विकासाचे विषय महत्त्वाचे आहेत.

शिक्षण.

आरोग्य आणि पोषण.

पिण्याचे पाणी आणि स्वच्छता.

पायाभूत सुविधा.

कृषी आणि जलसंपत्ती.

सामाजिक विकास

आपण टप्याटप्याने वरील सातही निर्देशांकावर बोलणार आहोत. प्रत्येक गावाची काही बलस्थाने असतात आणि काही कमतरता असतात, तसेच काही संधी आणि काही धोके देखील असतात.

आरोग्य

गावातील गरोदर मातांपैकी किती जणींची नोंदणी झाली आहे?

किती गरोदर मातांची पहिल्या तिमाहीत नोंदणी झालेली आहे?

किती मातांचे बाळंतपण आरोग्य केंद्रात झाले आहे?

जन्माच्या वेळी बाळाचे वजन किती होते ? कमी वजनाचे तर नव्हते ना?(२५०० ग्रॅमपेक्षा कमी) अशा कमी वजनाच्या बाळांचे प्रमाण किती?

संसर्गजन्य आजार उदा. क्षयरोगाचा संसर्ग आहे का?

गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय गुणवत्ता मानकानुसार नोंदी ठेवल्या जातात का ? त्यानुसार सेवा दिल्या जातात काय?

उच्च रक्तदाब असलेले व्यक्ती ?

मधुमेही रुग्ण किती ?

वरील मुद्दे आणि निर्देशांक पाहून सरपंचाला वाटेल, की हे काम तर आरोग्य खात्याचे मग मी काय करू शकतो? होय, हे खरे आहे, की हे काम आरोग्य खात्याचे आहे परंतु गावाचा प्रथम नागरिक म्हणून, तसेच गावचा प्रमुख म्हणून या बाबींची खातरजमा पंचायतस्तरावरून घेण्यात यावी.

म्हणजे प्रत्यक्ष सरपंच किंवा सदस्याने दररोज आरोग्य केंद्रात जाण्याची गरज नाही, तथापि ग्रामपंचायतीची आरोग्य आणि पोषण समितीचे हे काम असावे, ज्या समितीत पंचायतीतील किमान तीन महिला पंचायत सदस्य असतील आणि आरोग्य विभागाचा अधिकारी अथवा कर्मचारी त्या समितीत सदस्य असेल.

Shaley Poshan Aahar
Rural Development : सरपंचांनो, हवामान बदलानुसार आराखडा करा

या कामाची जबाबदारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय विभागाची असते.तथापि गावातील नागरिक हे आपलेच आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी कुटुंब प्रमुख म्हणून आपण नाही घेतली तर कोण घेणार? हा खरा संवेदनाचा मुद्दा आहे.

गावाच्या प्रमुखाने आपल्या मोबाईलमध्ये या निर्देशांकाची नोंद केल्यास मासिक बैठकीच्या वेळी आरोग्य कर्मचारी आपल्या कामाचा आढावा देत असताना वरील मुद्द्यावर आपली प्रगती लक्षात घेता येईल.

निष्कर्ष

याबाबत आपल्या गावात असलेल्या सर्व रुग्णांची नोंद होते का? असल्यास तो संपृक्त(सॅच्यूरेशन) निर्देशांक झाला. त्याच प्रमाणे याच मुद्द्यावर आपले राज्य आणि आपल्या देशाची काय स्थिती आहे हे लक्षात येईल.

कमतरता असल्यास त्यांची कारणे काय हे शोधता येतील, काही साधने कमी असल्यास ती पंचायत पुरवू शकेल आणि जर ते गावाच्या संख्येच्या १०० टक्के असल्यास त्या विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्याचा सत्कार करावा. त्यांचे गुणगौरव करावे. त्या त्या समितीच्या सदस्यांचा देखील सत्कार करावा. प्रत्येक तिमाहीत अशा प्रकारची बैठक घ्यावी. बैठकीच्या पूर्वी वर नोंदवलेली निर्देशांक तपासावीत आणि त्यानुसार कृती करावी.

कधी कधी कर्मचाऱ्यांच्या समस्या असतात, त्या समजून घेऊन त्यावर ग्रामपंचायत मदत करू शकत असल्यास नियोजन करावे. यातील कमतरतेच्या बाबीची नोंद आपल्या आराखड्यात करावे आणि गावचा अर्थ संकल्प करताना या बाबींचा समावेश करावा.

पोषण

गरोदर माता आपले पूरक पोषण गावातील अंगणवाडीत नियमितपणे घेते काय?

६ महिने वयोगटापासून ते ६ वर्षे वयोगटापर्यंतची मुले पूरक आहार अंगणवाडीत घेतात काय?

अंगणवाडीतील मुलांची नियमित नोंदी घेतल्या जातात काय?

पाच वर्षांच्या आतील मुलांचे तीव्र कुपोषण तर नाही ना ?

पाच वर्षाच्या आतील मुलांचे मध्यम कुपोषण तर नाही ना ?

गावातील अंगणवाडीत उपयोगात असणारी शौचालये आहेत का?

गावातील अंगणवाडीत पिण्याचे पाणी आहे काय?

वरील निर्देशांक पाहता ही महिला बालकल्याण मंत्रालय विभागाची कामे आहेत;परंतु गावच्या अंगणवाडीत जाणारी बालके आणि माता आपल्या गावाच्या नागरिक आहेत,हा संवेदनेचा भाग आहे. ही कामे सरपंचाने प्रत्यक्ष अंगणवाडीत दररोज जाऊन खात्री करणे आवश्यक नाही, तथापि मासिक बैठक आणि तिमाही मोठ्या बैठकीत याचा आढावा घ्यावा.

निष्कर्ष

पंचायतीला अंगणवाडीच्या इमारतीचे स्थिती लक्षात येईल. तेथे शौचालय आणि पिण्याचे पाणी आहे काय? हे देखील लक्षात येईल, इमारतीची स्थिती कशी आहे? काही दुरुस्तीची गरज आहे काय? असल्यास त्यासाठी आयडीसी तरतूद त्या त्या विभागामार्फत उपलब्ध होवू शकते काय? ग्रामपंचायतीच्या आराखड्यात याचा समावेश करावयाचा असल्यास तो करावा.

ही जबाबदारी आरोग्यदायी पोषण समिती वर सोपवल्यास मासिक सभेत त्या समितीने आपला अहवाल द्यावा आणि प्रमुख या नात्याने स्वतः सरपंचाने आपल्या दैनंदिन रोजनिशीत त्याची नोंद करावी. मी खात्रीने सांगतो, की या पद्धतीने बारकाव्यानीशी (निर्देशांक) नियमित लक्ष ठेवून त्याचा सातत्याने आढावा घेतल्यास गावातील जनतेस आपल्याबद्दल ममत्व वाढीस लागेल आणि त्याचा प्रमाणे शासकीय कर्मचारी यांच्या मनात ग्रामपंचायतीबद्दल आदर आणि विश्वास वाढेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com