
Nanded News : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन २०२५-२६ योजनेअंतर्गत काढणी पश्चात पायाभूत सुविधा या घटकांमध्ये तेल काढणी युनिट (१० टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे आणि तेलबिया प्रक्रिया युनिट प्रकल्पाचा जिल्हास्तरावर एक लक्ष्यांक प्राप्त आहे. इच्छुक व पात्र लाभार्थ्याने या प्रकल्पासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
यासाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के कमाल ९ लाख ९० हजार रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. तेलबिया संकलन, तेल काढणे आणि तेल उत्पादन कार्यक्षमता वाढवण्यासाठी, सध्या कार्यरत पायाभूत सुविधांची क्षमता किंवा कार्यक्षमता सुधारण्यासह कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी व कापूस बियाणे, नारळ, तांदूळ कोंडा तसेच वृक्षजन्य तेलबिया सहखाद्य दुय्यमस्रोतांद्वारे तेल उत्पादनास अनुदान देण्यात येईल.
या घटकाअंतर्गत जमीन आणि इमारतीसाठी साहाय्य दिले जाणार नाही किंवा प्रकल्प खर्चाची गणना करताना सदर खर्चाचा विचार केला जाणार नाही. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार लुधियाना व यासारख्या इतर केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या मिनी दालमील तसेच ऑइल एक्सपीलरची उत्पादक निहाय तेलघाणा मॉडेलला हे अनुदान अनुज्ञेय राहील. शासनाच्या सर्व योजनांमधून या बाबीसाठी एकाच योजनेचा एकदाच लाभ घेता येईल.
इतर (किरकोळ दुय्यम) वनस्पती तेल उपअभियान अंतर्गत ही बाब बँक कर्जाशी निगडित असून इच्छुक प्रक्रिया भागदाराने केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प साद करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार सदर बाबींच्या लाभास पात्र राहील.
यात भागीदार वजन, माती परीक्षण, बियाणे चाचणी, खतांची विक्री, एकात्मिक कीड, खत व्यवस्थापन, बियाणे प्रमाणिकरण प्रक्रिया आणि बीज-प्रक्रिया आणि शेतकरी सल्ला इत्यादीसारख्या इतर मूल्य साखळी सुविधा देखील विकसित करू शकतील.
निवडलेल्या लाभार्थ्याने संयंत्र खरेदी केल्यानंतर व त्याची मोका तपासणी झाल्या नंतरच तसेच प्रकल्प कार्यान्वित झाल्याची खात्री केल्यानंतरच अनुदानाची देय रक्कम त्याच्या थेट आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा करण्यात येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.