Tur Procurement Order: तूर खरेदीसाठी अखेर शासनाचे आदेश दाखल

Government Tur Purchase: राज्यात प्रतीक्षेत असलेल्या तूर खरेदीसाठी अखेर शासनाने आदेश काढले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी दोन लाख ९७ हजार ४३० टन तूर खरेदीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
Tur
TurAgrowon
Published on
Updated on

Akola News: हमीभाव खरेदी अंतर्गत राज्यात प्रतीक्षेत असलेली तूर खरेदी अखेर सुरू करण्याचे आदेश दाखल झाले आहेत. या वर्षात राज्याला दोन लाख ९७ हजार ४३० टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यानुसार जिल्हानिहाय उत्पादकता निश्चित करून खरेदीची मर्यादा नेमून देण्यात आली आहे.

१३ फेब्रुवारीपासून खरेदी सुरू करण्याची कार्यवाही आपल्यास्तरावरून करण्याबाबत खरेदी यंत्रणांना शासनाने सूचना केली आहे.राज्यात या हंगामात तुरीची सुमारे १२ लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली होती. काही महिन्यांपूर्वी १० हजारांवर विकणारी तूर बाजारात घसरली आहे. नव्या तुरीच्या आगमनानंतर दरात सुमारे अडीच ते तीन हजारांची घसरण झालेली आहे. आज बाजार समित्यांत सरासरी सात हजारांपर्यंत तूर विकली जात आहे.

Tur
Tur MSP Procurement: अखेर तूर हमीभावाने खरेदीला परवानगी; राज्यात हमीभावाने २ लाख ९७ हजार टन तूर खरेदी होणार

तर शासनाचा हमीभाव ७५५० रुपये जाहीर झालेला आहे. सरासरी बाजारभाव व हमीभावात पाचशे रुपयांपेक्षा अधिक तफावत तयार आहे. त्यामुळे हमीभाव खरेदीची मागणी सातत्याने सुरू होती. सोयाबीन खरेदी लांबल्याने यंदा तूर खरेदीला थोडा विलंब झाला आहे. नवीन तूर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच बाजारात यायला सुरुवात झाली.

बाजारात सध्या तुरीला किमान सहा हजार व कमाल ७४०० पर्यंत दर मिळतो आहे. शासकीय खरेदी सुरू न झाल्याने गेल्या महिनाभरात बाजार समित्यांमध्ये हजारो क्विंटल नवीन तूर शेतकऱ्यांना कमी दराने विकावी लागल्याची वस्तुस्थिती आहे.

Tur
Tur Procurement: तुरीच्या शासकीय खरेदीचे आदेश नाहीच

जिल्हानिहाय तूर उत्पादकता व होणारी खरेदी

कृषी खात्याच्या उत्पादकता अंदाजानुसार, राज्यात यावेळी ११ लाख ९०,१८६ टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यापैकी २५ टक्के म्हणजेच २ लाख ९७ हजार ५४६ टन तुरीची खरेदी केली जाणार आहे. यात प्रामुख्याने अकोला जिल्ह्यातील हेक्टरी उत्पादकता १४०० किलो ग्राह्य धरीत २१ हजार ६१६.२५ टन तूर खरेदी केली जाईल.

बुलडाणा जिल्ह्यात ८०० किलो उत्पादकता (खरेदी उद्दिष्ट १७,७६०.७५ टन), लातूर ७०० (१२,९१८.५ टन), यवतमाळ १२१८ (३२,३८४.२५टन), अमरावती १३६० (३९,६५४ टन), वाशीम ७०३ (११,६७६.२५ टन), सोलापूर ७६० (१८,८२६.२५ टन), सांगली ७४३ (२०३८.७५ टन), छत्रपती संभाजीनगर ८२९ (७४९१.७५ टन), जालना ९५० (११,७२५.५ टन), बीड ८३० (९८९३.७५ टन), धाराशिव ६८० (७३.८ टन),

नांदेड ९०० (१३,७२६.५ टन), परभणी १०५० (१०,२२५.५ टन), हिंगोली ११५०(८८६५ टन), वर्धा १२०० (१७,८३५.७५टन), नागपूर १०५० (१४,५९८.२५ टन), भंडारा ६०० (१२८५.७५ टन), गोंदिया ५५१ (६४६ टन), चंद्रपूर १४५० (११,०२३ टन), गडचिरोली ११५१ (१७३२ टन)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com