
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे, तरी १३ साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊसबिले दिली नाहीत. त्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचाललक प्रकाश आष्टेकर यांनी या कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच येत्या गुरुवारी (ता.१३) साखर आयुक्तालयात त्यावर सुनावणी ठेवली आहे.
रयतक्रांती शेतकरी संघटनेचे नेते, ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रा. सुहास पाटील यांनी यासंबंधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत साखर सहसंचालकांनी या कारखान्यांना नोटिसा काढल्या आहेत.
त्याच्यावरील पहिली सुनावणी आता १३ फेब्रुवारीला होणार आहे. या कारखान्याच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापक यांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या आधीही संघटनेने या मागणीसाठी सतत पाठपुरावा करत आंदोलन केले. पण कार्यवाही झाली नव्हती, पण आता साखर सहसंचालक कार्यालयाने याबाबत भूमिका घेतल्याचे दिसते.
...या कारखान्यांचा समावेश
नोटीस बजावलेल्या साखर कारखान्यांमध्ये वेणूनगर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, आलेगाव बु (ता. माढा) येथील भैरवनाथ शुगर वर्क्स, तुर्कपिंपरी (ता. बार्शी) येथील बबनरावजी शिदे शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रिज, अनगर (ता. मोहोळ) येथील लोकनेते बाबूराव पाटील अॅग्रो इंडस्ट्रिज,
नांदूर (ता.मंगळवेढा) येथील आवताडे शुगर, वाकीशिवणे (ता.सांगोला) येथील धाराशिव शुगर, उपळाई (ता.बार्शी) येथील इंद्रेश्वर शुगरमिल्स, वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया शुगर, लवंगी (ता. मंगळवेढा) येथील भैरवनाथ शुगर वर्क्स,
कचरेवाडी (ता. मंगळवेढा) येथील युटोपियन शुगर्स, बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल शुगर इथेनॅाल अॅण्ड कोजनरेशन इंडस्ट्रिज, भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रिज, तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धनाथ शुगर या कारखान्यांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.