Sugarcane FRP : ‘मांजरा’चे सर्व कारखाने देणार तीन हजारांचा भाव

Sugar Factory Update : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून, सहकारी साखर उद्योगात सक्षम व यशस्वी साखर कारखाने म्हणून परिवारातील साखर कारखान्यांची ओळख आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Latur News : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून, सहकारी साखर उद्योगात सक्षम व यशस्वी साखर कारखाने म्हणून परिवारातील साखर कारखान्यांची ओळख आहे.

चालु हंगामात गाळप झालेल्या उसाला परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, विलास साखर कारखाना युनिट एक या तीन साखर कारखान्याकडून किमान तीन हजार रुपये प्रतिटन भाव देण्यात येणार, असल्याची माहिती मांजरा परिवाराचे मार्गदर्शक राज्याचे माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली.

Sugar Factory
Sugarcane FRP Payment : एफआरपीचे ८,१२६ कोटी रुपये ७० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात: केंद्रीय अन्नमंत्री जोशी यांची माहिती, गेल्यावर्षी ९९ टक्के पेमेंट देण्यात आले

मांजरा साखर कारखान्यात उत्पादित दोन लाख २२ हजार २२२ साखर पोत्यांच्या (पन्नास किलो वजन) पूजनप्रसंगी मंगळवारी (ता. २४) ते बोलत होते. मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात गाळप उसाला पहिली उचल दोन हजार सातशे दिली आहे. चालू वर्षी उत्तम पाऊस असल्याने साखर उतारा चांगला प्राप्त होत आहे.

त्यामुळे निश्चितच ऊसदर हा किमान तीन हजार रुपये देणार असून हंगामाच्या समाप्तीनंतर त्यापेक्षा अधिक निघत निघत असेल तर जास्तीचा भाव दिला जाणार आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. मांजरा कारखान्याचे चालू गळीत हंगामात उत्तमरीत्या गाळप सुरू आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात २९ दिवसांत मंगळवारपर्यंत एक लाख ४८ हजार ५५० मेट्रिक टनांचे गाळप केले.

Sugar Factory
Sugarcane FRP : सहकारमहर्षी उसास देणार २९०० रुपये प्रतिटन

त्यातून एक लाख २० हजार नऊशे क्विंटल साखरेचे उत्पादन करून ६२ लाख २३ हजार किलोवॉट वीजनिर्मिती केली आहे. यावेळी माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, आबासाहेब पाटील, लक्ष्मणराव मोरे, सर्जेराव मोरे, धनंजय देशमुख, जगदीश बावणे, रवींद्र काळे, अनंतराव देशमुख, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, प्रवीण पाटील, सचिन दाताळ,

संभाजी सुळ, प्रा. शशिकांत देशमुख, दयानंद बिडवे, बाळासाहेब जाधव, विकास देशमुख, सूर्यकांत पाटील, सचिन शिंदे, निळकंठ बचाटे, तात्यासाहेब देशमुख, धनराज दाताळ, ज्ञानेश्‍वर पवार, अशोक काळे, कैलास पाटील, वसंत उफाडे, नवनाथ काळे, बंकट कदम, शेरखान पठाण, सदाशिव कदम, अनिल दरकसे, विशाल पाटील, शंकरराव बोळंगे, बाबूराव जाधव, ज्ञानेश्‍वर भिसे, महेंद्रनाथ भादेकर, विलास चामले, श्रीनिवास देशमुख, कार्यकारी संचालक पंडित देसाई यांच्यासह खाते प्रमुख अधिकारी, कामगार व शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com