Natural Farming : नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगद्वारे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन

Agriculture Mission : देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयांतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगची (एनएमएनएफ) सुरुवात केली आहे.
Natural Farming
Natural Farming Agrowon
Published on
Updated on

Akola News : देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयांतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगची (एनएमएनएफ) सुरुवात केली आहे.

सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे, हे याचे उद्दिष्ट आहे. त्याच अनुषंगाने बाळापूर तालुका कृषी अधिकारी व चिंचोली (गणू) ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

Natural Farming
Natural Farming : शेतीसह काळ्या आईलाही केले श्रीमंत

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनमाला वाघ होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्र अधिकारी व्ही. एम. शेगोकार, विशेषज्ज्ञ अभिजित वंजारे, कृषी सहायक ऋषिकेश गव्हाळे होते.

या वेळी श्री. शेगोकार यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती पद्धती, शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च, खते, कीटकनाशके यांच्या संपर्कातून होणारे आरोग्य धोके देखील कमी करतील आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी निरोगी आणि पौष्टिक अन्न प्रदान करेल.

Natural Farming
Natural Farming : शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे

अभिजित वंजारे यांनी मातीचे आरोग्य, सुपीकता आणि गुणवत्ता सुधारतील. पाणी साचणे, पूर, दुष्काळ इत्यादी हवामान धोक्यांविरुद्ध लवचीकता निर्माण करतील. मातीतील कार्बनचे प्रमाण आणि पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत सुधारणा करून, एनएफमध्ये मातीतील सूक्ष्मजीव आणि जैवविविधतेत वाढ होते. कार्यक्रमाला गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंबादास कळसकार, बाबूलाल कळंब, राहुल मिटकरी, सुधीर गोतमारे, विशाल बोंद्रे, रमेश गव्हाळे, विजय गोतमारे, भिकूबाई गाडगे, अरविना गोतमारे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश गव्हाळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com