Maratha Reservation : कुणबी नोंदीचे सरकारी पुराव्याचे अभिलेख सादर करावेत

Kunbi Record : मराठा समाजाच्या कुणबी असलेल्या नोंदी शोधण्याचे सरकारी पातळीवर काम सुरु आहे.
Kunbi Record
Kunbi RecordAgrowon
Published on
Updated on

Nagar News : मराठा समाजाच्या कुणबी असलेल्या नोंदी शोधण्याचे सरकारी पातळीवर काम सुरु आहे. १९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे असणारे अभिलेख जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. २ डिसेंबरला विभागीय आयुक्त याबाबत आढावा घेणार आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चव्हाट्यावर आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर वातावरण ढवळून काढले आहे. शासनाने मराठवाड्यातील मराठा समाजाच्या मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे.

Kunbi Record
Maratha Reservation : अकोल्यात आतापर्यंत आढळल्या एक लाख ३२ हजार कुणबी नोंदी

या समितीस मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळ झालेले करार निजामकालीन संस्थानिकांना दिलेली सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी अंतिम पात्र व्यक्तींना मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे.

Kunbi Record
Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्र तपासणी, वितरणासाठी विशेष कक्ष

शासनाच्या ३ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आलेली आहे. कुणबी नोंदीसाठी नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी नोंदीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.

नगर जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकानी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेख जिल्हा स्तरावरील स्थापित विशेष कक्षात दिनांक 21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर,2023 या कालावधीत जमा करता येणार आहेत. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुणबीच्या नोंदी सापडत आहेत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com