Maharashtra River Revitalization: नदी पुनरुज्जीवनासाठी धोरणात्मक निर्णयांची गरज

Water Conservation: महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच नद्यांवर अतिक्रमणाच्या समस्या आहेत. बऱ्याच नागरी भागामध्ये या समस्यांनी अख्खी नदीच गिळंकृत केल्याचे चित्र आहे. हे लक्षात घेऊन नद्यांना पुनरुज्जीवित करण्याच्या अभियानात प्राधिकरणाला मोठ्या प्रमाणात धोरणात्मक निर्णय तसेच लोकसहभाग वाढवावा लागणार आहे.
River
RiverAgrowon
Published on
Updated on

Protection of Water Resources: महाराष्ट्र हे देशातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले तसेच झपाट्याने विकास करणारे राज्य गणले जाते. विकसित महाराष्ट्राची २०४७ काळातील आखणी करत असताना पाण्याचा संतुलित वापर आणि प्रदूषणाची तीव्रता निम्न पातळीवर आणण्यासाठी नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरते, कारण जलसंपत्तीचे रक्षण करणे हे प्राधान्याचेच आहे.

औद्योगिक सांडपाणी

उद्योगातून निर्माण होणारे सांडपाणी आणि त्याचे उपाय तसेच त्याचे व्यवस्थापन ही एक जटिल समस्या आहे. कोणत्याही उद्योगातून निर्माण होणारे सांडपाणी प्रक्रिया केल्याविना नदीमध्ये सोडू नये असा नियम असताना ते सोडले जाते. अनेक नद्यांतील मासे कैक वेळेस अचानक मृत झाल्याचे वृत्तपत्रातून वाचण्यात येते, ही बाब मन विषण्ण करणारी आहे. या बाबींची विधिमंडळात देखील गंभीर चर्चा झाल्याचे दिसते. त्यामुळे नद्यांना प्रदूषण मुक्त करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे, याची जाणीव होते ही निश्‍चित आनंदाची बाब आहे.

विवादांचे निराकरण

अतिक्रमणाच्या समस्यांना सामोरे जाणे

महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच नद्यांवर अतिक्रमणाच्या समस्या आहेत. बऱ्याच नागरी भागामध्ये या समस्यांनी अख्खी नदीच गिळंकृत केल्याचे चित्र आहे. कोठे नदीच्या सीमा आकुंचित झाल्या आहेत तर कोठे नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

नदी प्रकल्पांसाठी जमीन संपादन

अनेक वेळा विभागामध्ये समन्वय नसल्याने कामाला विलंब होतो. सबब आवश्यक असलेल्या नदीचे सीमांकन करणे, त्यांचे चिन्हीकरण करणे इत्यादी समस्या या सुलभ होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

विविध विभागांचा समन्वय

जलसंपदा, जलसंधारण, ग्राम विकास, नगर विकास इत्यादी विभागाचे एकमत यामुळे होऊ शकेल. यातून सुसंवाद घडेल अशी अपेक्षा आहे.

देखरेख यंत्रणा

जल प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी संनियंत्रण समित्यांची निर्मिती.

प्रभावी अंमलबजावणीसाठी या समित्यांच्या अधिकारांना वाढविण्याचा प्रस्ताव.

औद्योगिक आणि सांडपाणी सारखे व्यापक प्रदूषणाचे कारण तसेच शेतीमधील प्रदूषण आणि घन कचऱ्याचे डंपिंग या सारख्या बाबीदेखील या प्राधिकरणाच्या कक्षेत येतात.

River
River Conservation : समुदायाच्या सहभागातून वाचेल विदर्भातील नद्यांचे अस्तित्व

आव्हाने आणि धोरणात्मक दृष्टिकोन

महाराष्ट्रातील नद्यांना पुनरुज्जीवित करण्याच्या अभियानात प्राधिकरणाला महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

धोरणात्मक व्यूहरचना

एकात्मिक दृष्टिकोन अंगीकार करताना, सांडपाणी उपचार, औद्योगिक सांडपाणी नियंत्रण आणि पर्यावरणाचे पुनर्संचयित या सर्वांचे एकत्रीकरण हे आव्हानात्मक काम असेल.

वैज्ञानिक नियोजन

केवळ नद्यांचे बाह्य सौंदर्यीकरण करण्याच्या अट्टहास न करता माहिती, विज्ञान किंवा संग्रहित माहितीच्या आधारित उपाय आणि जैवविविधता पुनर्स्थापित करण्यावर भर असावा, असे अभिप्रेत आहे.

क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण

क्षमता वाढ: नदी व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणावरील अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम.

तंत्रज्ञानाचा वापर: रिअल-टाइम पाणी गुणवत्ता मूल्यांकनासाठी स्मार्ट संनियंत्रण पद्धतीचा शोध आणि त्याचा अवलंब.

प्राधिकरणाची योजना

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान सारख्या प्रयत्नातून काही शिकणे निश्‍चितच गरजेचे आहे. त्या आधारे रचनात्मक मार्गांनी या आव्हानांना सामोरे आवश्यकता आहे.

विद्यमान जल संस्थांशी संबंध

प्राधिकरण हे महाराष्ट्रातील विद्यमान जल शासन रचनांना पूरक असणार आहे. जसे की

महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण (MWRRA), जी जल वाटप आणि नियमनावर लक्ष केंद्रित करते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB): या मंडळाचे सदस्य सचिव प्राधिकरणाचे सचिव असू शकतील. प्रदूषण नियंत्रण आणि अंमलबजावणीवर समन्वय राखला जाईल.

जलसंपदा विभाग: खोरे निहाय सिंचन विकास महामंडळांशी समन्वय.

भविष्यातील दिशा आणि अपेक्षित परिणाम

प्राधिकरणाने येत्या काही वर्षांसाठी एक महत्त्वाकांक्षी प्राधान्यक्रम निश्‍चित केलेले आहेत.

तातडीची प्राधान्यक्रम (२०२५-२०२६):

संस्थात्मक रचना आणि समर्पित कर्मचारी वर्ग.

सर्व ५६ प्रदूषित नद्यांसाठी कृती योजना अंतिम करणे.

नदी खोऱ्यात काही मॉडेल प्रकल्प सुरू करणे.

देखरेख आणि मूल्यांकन चौकट स्थापित करणे.

River
River Pollution Control : नदी प्रदूषणावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण

मध्यम-मुदतीची उद्दिष्टे (२०२६-२०२८)

प्रमुख स्रोतांमधून प्रदूषण टक्केवारीत लक्षणीय घट.

अतिक्रमित नदी, तळे आणि पूरमैदान पुनर्स्थापित करणे.

प्रमुख नद्यांमध्ये पाणी गुणवत्ता निर्देशांक सुधारणे

नदी संवर्धनात सामुदायिक सहभाग वाढवणे.

दीर्घकालीन दृष्टिकोन (२०२८-२०३०)

प्रमुख नदी प्रणालींमध्ये (एकॉलोगीकॅल फ्लो) प्रवाह निश्‍चित करणे.

जैवविविधता कॉरिडॉर राखणे, शाश्‍वत नदीकाठ विकास.

सर्व नदीखोऱ्यांमध्ये याची पुनरावृत्ती.

संस्थात्मक नदी संवर्धन पद्धती

प्राधिकरणाच्या ध्येयामध्ये महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाचा कलंक पुसून त्याचे समृद्ध पर्यावरणात रूपांतरित करणे आहे, जेथे जलचर परत येत आहेत आणि पुनर्जीवित नदीकाठावर पूर्वीप्रमाणेच चैतन्य निर्माण करण्यावर भर दिला आहे.

इतर नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांमधून शिकवण

काही चांगल्या प्रकल्पातून काही बोध घेऊन त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करणे.

स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणाचे पुनरुज्जीवन

नियमित स्वच्छता मोहिमांद्वारे मजबूत सामुदायिक सहभाग.

नियमित मॉनिटरिंग आणि त्यांचे समस्या निराकरण.

नदीकडे एक जिवंत घटक म्हणून पाहणे.

नदीशी सांस्कृतिक नाते पुन्हा दृढ करणे.

मागील चुका टाळणे

नदी काठांच्या सौंदर्यीकरणाच्या पलीकडे विचार करून जैवविविधता राखणे.

नियमित आणि प्रभावी मॉनिटरिंग सिस्टिम सुनिश्‍चित करणे.

महाराष्ट्रामध्ये नदी पुनरुज्जीवन या उद्देशासाठी प्राधिकरण स्थापन होणे हे निश्‍चित स्वागतार्ह बाब आहे. तथापि, यापूर्वी अनेक विषयासाठी प्राधिकरण स्थापन झालेली आहेत त्यांच्या यशापयशाचे मूल्यमापन देखील झालेले आहे. त्याचा निश्‍चितच विचार केलेला असेल. त्या आधारे या प्राधिकरणाची दिशा निश्‍चित करणे प्राधान्याचे ठरते. अन्यथा, ही अजून एक शासकीय संस्था ठरू नये.

प्रत्यक्ष नदी या संस्थेवर काम होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शास्ती आणि उत्तेजना या दोन्ही गोष्टीच्या सहभागी करणे गरजेचे आहे. अगदी व्यक्तीचा स्तरापासून सामुदायिक स्तरापर्यंत याचे नियोजन करणे आवश्यक ठरते. राजकीय इच्छाशक्तीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. हे प्राधिकरण स्थापन करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले आहे. यथावकाश याचे ध्येयधोरणे उद्दिष्टे मूल्यमापनाच्या पद्धती याही निश्‍चित होतील. काही आपत्कालीन, काही मध्यमकालीन आणि काही दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवलेली आहेत.

९७६४००६६८३, (माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com