Fodder Depo : पावसाळ्यात चारा डेपो सुरू करण्याची उपरती

Animal Fodder Issue : राज्यात बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही अंशी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मिटण्याची चिन्हे आहेत. मात्र अशात राज्य सरकारला चारा डेपो सुरू करण्याची उपरती सुचली आहे.
Fodder Shortage
Fodder ShortageAgrowon

Mumbai News : राज्यात बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही अंशी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मिटण्याची चिन्हे आहेत. मात्र अशात राज्य सरकारला चारा डेपो सुरू करण्याची उपरती सुचली आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींवर सोल पॅनेल बसविण्यासह टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी टाक्या खरेदीचे आदेश सरकारने दिले आहेत.

समाधानकारक पाऊस होईपर्यंत राज्यातील १२४५ महसुली मंडलांमध्ये गरजेनुसार चारा डेपो सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. चारा डेपो सुरू करण्याचे आणि त्यांच्या खर्चाची बिले मंजूर करण्यासह राज्यातील पाणी टंचाई गृहीत धरून विहिरींवर सोलर पॅनेल बसविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Fodder Shortage
Maize Fodder Cultivation : अशी करा सकस, रुचकर चाऱ्यासाठी मका लागवड ?

राज्यातील ४० तालुके आणि १२४५ महसुली मंडलांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सात प्रकारच्या सवलती देण्यात येत होत्या. राज्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. पाणी आणि चाराटंचाईमुळे पशुपालकांचे मोठे हाल झाले तरीही पशुसंवर्धन विभागाने संभाव्य भ्रष्टाचाराचे कारण देत चारा छावण्या सुरू करण्यास परवानगी दिली नाही.

पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार १५ जुलैपंर्यंत पुरेल इतका चारा राज्यात उपलब्ध आहे. तरीही आवश्यकतेनुसार राज्यातील १२४५ महसुली मंडळांत चार डेपो सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जोवर राज्यात समाधानकारक पाऊस पडत नाही तोवर हे चारा डेपो सुरू राहणार आहेत. दरम्यान ४० तालुक्यांमध्ये हे डेपो सुरू करायचे अथवा नाही याबाबत आदेश दिलेले नाहीत.

Fodder Shortage
Animal Fodder : निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे तंत्र

आचारसंहिता संपल्यानंतर राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत आणि पर्जन्यमानाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहिरींवर सोलार पॅनेल बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुष्काळसदृश महसुली मंडले
अमरावती : २०१
छत्रपती संभाजीनगर : ६६
कोल्हापूर : २५
जळगाव : ९८
जालना : १६
धुळे ः ५६
नंदूरबार : ३३
नांदेड : ३०
नागपूर : १४
नाशिक : ४१
परभणी : ५१
धाराशिव : १०
नगर : ३६
हिंगोली : ७
पुणे : ४८
बीड : ५२
बुलडाणा : ७२
भंडारा : १
यवतमाळ : १६
लातूर : ५२
वर्धा : १४
वाशीम : ३७
सांगली : ३८
सातारा : ७३
सोलापूर : ३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com