Crop Loan : पीक कर्जावरील व्याजदर कमी करा ; खासदार वाजे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहळ यांच्याकडे मागणी

Crop loan interest rates : प्राथमिक कृषी पतसंस्था, शेतकरी सेवा संस्था आणि मोठ्या आदिवासी बहुउद्देशीय संस्थांकडून आकारला जाणारा पीक कर्जावरील व्याजदर व राष्ट्रीय, जिल्हा बँकांकडून आकारला जाणारा व्याजदर यात मोठी तफावत आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Sinnar News : सिन्नर, जि. नाशिक : प्राथमिक कृषी पतसंस्था, शेतकरी सेवा संस्था आणि मोठ्या आदिवासी बहुउद्देशीय संस्थांकडून आकारला जाणारा पीक कर्जावरील व्याजदर व राष्ट्रीय, जिल्हा बँकांकडून आकारला जाणारा व्याजदर यात मोठी तफावत आहे. यातील विसंगती दूर करावी, पीक कर्जावरील व्याजदर कमी करावा.

सिन्नर तालुक्यातील गोदा युनियनकडून आकारला जाणारा व्याजदर कमी करावा, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्याकडे केली. त्यांची भेट घेऊन याबाबात चर्चा केली. पीक कर्जातील विसंगती निदर्शनास आणून देताना खासदार वाजे यांच्या मागणीला यश आल्यास देशभरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Crop Loan
Crop Loan : कर्जावरील व्याज आकारणी योग्य झाली आहे का?

सिन्नरच्या नायगाव येथील गोदा युनियन किसान सेवा सहकारी संस्थेला युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे वित्तपुरवठा केला जातो. ही संस्था प्रायोजक बँक म्हणून काम करते. भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण केल्यानुसार भारत सरकारच्या व्याज सवलत योजनेअंतर्गत व्यावसायिक बँकांनी पुढील संस्थांना कर्ज देण्यासाठी दिलेल्या कर्जावर व्याज सवलत देण्याची तरतूद नाही. त्यामुळे युनियन बँक ऑफ इंडिया बँक गोदा युनियनकडून पीक कर्जावर उच्च दराने (११ टक्के प्रतिवर्ष) व्याज आकारत आहे.

याउलट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सोसायट्यांना दिलेल्या पीक कर्जावर कमी व्याजदर (७ टक्के) आकारत आहेत. यामुळे सहकारी संस्था व शेवटी शेतकऱ्यांवर अन्यायकारक आर्थिक भार निर्माण होत असल्याची बाब वाजे यांनी निदर्शनास आणून दिली.

केंद्राने ५ जुलै २०१६ ला तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज वार्षिक सात टक्के व्याजदराने उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पीक कर्जदारांत समानतेची गरज आणण्याची मागणी वाजे यांनी मोहोळ यांच्याकडे केली. बँक अधिकारी आणि आरबीआयला वारंवार निवेदन देऊनही या समस्येवर कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. यात हस्तक्षेप करून संस्थांद्वारे पीक कर्जावरील व्याजदर कमी करण्यासाठी पावले उचलावीत. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या समान व्याजदराची सुनिश्चितता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. गोदा युनियनच्या बाबतीत मार्ग काढण्याची विनंतीही वाजे यांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मोहोळ यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com