Nagpur Agri College: शासकीय कृषी महाविद्यालयाची इमारत अडकली लालफितीत

New Building Delay: नव्या इमारतीच्या बांधकामासाठी प्रस्ताव मागविण्यात आला. त्याला मंजुरी मिळून ५९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. परंतु विविध विभागांच्या परवानग्यांअभावी हे काम लालफितीत अडकले आहे.
Nagpur Agri College
Nagpur Agri CollegeAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: ब्रिटिशकालीन कृषी महाविद्यालयाची इमारत खिळखिळी झाल्याने नव्या इमारतीच्या बांधकामासाठी प्रस्ताव मागविण्यात आला. त्याला मंजुरी मिळून ५९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. परंतु विविध विभागांच्या परवानग्यांअभावी हे काम लालफितीत अडकले आहे.

नागपूर येथील कृषी महाविद्यालय देशातील सर्वांत जुन्या कृषी शिक्षण संस्थांपैकी एक आहे. त्याची स्थापना १९०६ मध्ये ब्रिटिश सरकारने केली होती. हे महाविद्यालय महाराजबागेतील ऐतिहासिक व्हिक्टोरिया इमारतीत सुरू आहे. ही इमारत १८५६ मध्ये म्हणजेच तब्बल १६९ वर्षांपूर्वी बांधली गेली, परिणामी ती खिळखिळी झाली आहे.

Nagpur Agri College
Agriculture Inflation: शेतीमालाचे भाव पाडून महागाईचा नीचांक

या इमारतीची अनेकदा डागडुजी करूनही धोका टळला नाही. विशेष म्हणजे ही ऐतिहासिक वारसा इमारत असल्याने पुरातत्त्व विभागाच्या परवानगीनंतरच या इमारतीची देखभाल व दुरुस्ती करावी लागते.

Nagpur Agri College
Agriculture Education: कृषी शिक्षणातील संधी अन् फायदे

त्यामुळेच जुन्या इमारतीऐवजी विद्यार्थ्यांसाठी नवी इमारत बांधत त्यातून कृषीचे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली होती. यासाठी शासनाने महाविद्यालयाच्या नव्या इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता दिली. इतकेच नाही तर ५९ कोटींचा निधी मंजूर केला. परंतु शासनाच्याच विविध विभागांच्या परवानग्यांअभावी हे काम रखडले आहे.

इमारतीसाठी शेत जमिनीचा वापर नाही

महाविद्यालयाची नवीन इमारत मॉनिटरिंग इमारतीच्या पुढील भागात बांधण्यात येणार आहे. सध्या या जागेवर मोडकळीस आलेल्या शासकीय क्वार्टर्स आणि जुने गोदाम आहे. ते पाडून ‘जी प्लस २’ मजल्यांची भव्य इमारत उभारली जाणार आहे. इमारतीसाठी कुठल्याही परिस्थितीत शेतजमिनीचा वापर होणार नाही. व्हिक्टोरिया इमारतीच्या स्थापत्यशैलीशी सुसंगत अशीच नव्या इमारतीची रचना राहणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com