Cow Tourism: कृषी महाविद्यालयाच्या देशी गोपालन केंद्रात गौ पर्यटन

Desi Gopalan Kendra: पुणे कृषी महाविद्यालयाच्या मरीआई गेट येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने गौ पर्यटनाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
Indigenous Cow
Indigenous CowAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे कृषी महाविद्यालयाच्या मरीआई गेट येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने गौ पर्यटनाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या साहिवाल, गीर, लाल सिंधी, थारपारकर व राठी या पाचही गोवंशांच्या जातिवंत गाई व वळूचे कळप येथे आहेत. याशिवाय या केंद्रावर महाराष्ट्रातील खिलार, कोकण कपिला, डांगी, देवणी, लाल कंधारी व गौळाऊ या गाईंच्या जातींबरोबरच आंध्र प्रदेशातील लहान आकाराकरिता प्रसिद्ध असणारी पुंगनूर व मिनीएचर पुंगनूर या गायीदेखील आहेत.

Indigenous Cow
Indigenous Cow: सेंद्रिय, नैसर्गिक शेतीला देशी गोवंशाची साथ

गौ पर्यटनाच्या दरम्यान सहभागी पर्यटकांना देशी गोवंशांचे महत्त्व, त्यांचे वर्गीकरण व उपयुक्तता, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची उद्दिष्टे, चालू असलेले संशोधन व इतर कार्याविषयी माहिती दिली जाते. या शिवाय पर्यटकांना येथील शाश्‍वत देशी गोपालनाचे मॉडेल, दूध, गोमय व गोमूत्र प्रक्रिया करण्याचे एकात्मिक मॉडेल, गोबरगॅस व सौरऊर्जा प्रणाली व गायींच्या उपचाराकरिता आवश्यक वनस्पतींचे संग्रहालय देखील इथे पाहावयास मिळते.

Indigenous Cow
Indigenous Cow : स्थानिक पशुधनाचे जतन, संवर्धन करूया

भारतातील ११ देशी गोवंश एका ठिकाणी पाहण्याची व माहिती करून घेण्याची संधी येथे उपलब्ध आहे. या केंद्रावर गौ पर्यटनाच्या दरम्यान काऊ कडलिंग थेरपीचा लाभ देखील पर्यटकांना घेता येतो. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील गौ पर्यटन उपक्रम सशुल्क आहे.

आज आपल्या देशामधल्या गोवंशातील समृद्ध विविधतेची सर्वसामान्यांना ओळख व माहिती होणे गरजेचे आहे. विशेषतः शहरी लोकांना देशी गाईंचे आरोग्यातील महत्त्व याविषयी जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने शहरी व ग्रामीण अशा सर्वच लोकांकरिता गौ पर्यटन उपक्रम हा एक सुखद अनुभव ठरणार आहे. त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.
डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com