Goat Farming : शेळीपालन, रेशीम उद्योग एकमेकांस पूरक

Goat Rearing Business: अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. खाद्याचे,शेळ्यांच्या आरोग्याचे, निवाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.
Goat Farming Silk Farming
Goat Farming Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

Jalna News : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासाठी शेळीपालन आणि रेशीम उद्योग एकमेकास पूरक होऊ शकतात, असे प्रतिपादन क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथील निवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम.व्ही.धुमाळ यांनी केले.

खरपुडी कृषी विज्ञान मंडळाच्या ३३६ व्या मासिक चर्चासत्रात बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा रेशीम अधिकारी अजय मोहिते आणि प्रमुख पाहुणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने तसेच केंद्रीय रेशीम बोर्ड शास्त्रज्ञ अंकुश घाडगे आणि कृषी विज्ञान केंद्र वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनूने यांची प्रमुख उपस्थिती होती.

Goat Farming Silk Farming
Goat Farming : दोन अपयशानंतर शेळीपालनाने दिली यशाची चाहूल

डॉ. धुमाळ म्हणाले, की यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल, आर्थिक स्थैर्य वाढेल. अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. खाद्याचे,शेळ्यांच्या आरोग्याचे, निवाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो. बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे शेतकऱ्यांनी आपली परिस्थिती बघून नियोजन करावे.

Goat Farming Silk Farming
Sericulture : दराच्या तेजीने रेशीम कोष उत्पादकांमध्ये उत्साह

शेळीपालन अल्प गुंतवणुकीनेही केला जाऊ शकतो,काही जातीच्या शेळ्या या १४ महिन्यामध्ये दोनदा वेतात.या मुळे अधिक उत्पन्न मिळते. श्री. मोहिते म्हणाले, की रेशीम शेती एक पूरक व्यवसाय असून त्यात ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे, तुती लागवड करताना जमिनीची निवड, तुती वाणाची निवड, तुती कलमांची लागवड, खत व्यवस्थापन आणि रेशीम कीटक संगोपन करण्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले.

तसेच रेशीम कार्यालयाच्या विविध योजना च्या संदर्भात श्री. घाडगे यांनी समजाऊन सांगितले. डॉ. माने यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थिती शेतकऱ्यांना दिली. शेळीपालन आणि कुकुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.डॉ. सोनुने म्हणाले, सध्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी जोड व्यवसायाची सांगड घालून आर्थिक स्थैर्य साधावे. तसेच शेळीपालन आणि रेशीम शेती हे चांगले पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com