Parbhani News : यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात ७४४ कोटी ८३ लाख रुपये व हिंगोली जिल्ह्यात ५१० कोटी ३२ लाख रुपये असे दोन जिल्ह्यात मिळून एकूण १ हजार २५५ कोटी १५ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात २५८ कोटी ३२ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील बँकांना दिलेल्या ७४४ कोटी ८३ लाख रुपये पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये व्यापारी बँकांना (राष्ट्रीयीकृत) एकूण ४४२ कोटी ८ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १६१ कोटी ९१ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण ग्रामीण बँकेला १०६ कोटी २१ लाख रुपये, खाजगी बँकांना ५३ कोटी ६३ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.
गतवर्षी (२०२२-२३) च्या रब्बी हंगामात व्यापारी बँकांना ४०८ कोटी ६८ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी १२९ कोटी १८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ८६ कोटी ९५ लाख रुपये असे एकूण ६२४ कोटी ८१ लाख ७१ हजार रुपये उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ६१६ कोटी ९८ लाख रुपये (९८.७५ टक्के) वाटप झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १२० कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ११३ कोटी ४७ लाख रुपये, व्यापारी बँकांना २८९ कोटी ५० लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १०७ कोटी ३५ लाख रुपये असे एकूण ५१० कोटी ३२ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.
गतवर्षी (२०२२-२३) रब्बीत ३७२ कोटी रुपये उद्दिष्ट असताना ३८२ कोटी ४० कोटी रुपये (१०२.८० टक्के) वाटप झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात १३८ कोटी ३२ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.