Electricity Bill Payment
Electricity Bill PaymentAgrowon

Electricity Bill : गो ग्रीन सेवा निवडल्यास वीजबिलात १२० रुपये सूट ; महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ संकल्पनेला बळ

Go Green Service : नूतन वर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीजबिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे.
Published on

Nashik News : नाशिक : नूतन वर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीजबिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे.

त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीजबिलात १० रुपये सूट देण्यात येते. मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यांसाठी तत्काळ १२० रुपये एकरकमी सवलत मिळणार आहे.

Electricity Bill Payment
Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’साठी पुढाकार; कागदी बिलाला नकार

गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई-मेलद्वारे वीजबिल पाठविण्यात येते. शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीजबिलात १० रुपये सूट देण्यात येते.

महावितरणने ग्राहकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहाऐवजी पहिल्याच महिन्यातील वीजबिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्यात येणार आहे.

महावितरणच्या ३ कोटी लघूदाब ग्राहकांपैकी आतापर्यंत ४ लाख ६२ हजार म्हणजेच १.१५ टक्के ग्राहकांनी या सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतुने महावितरणने हा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळ १२० रुपये एकरकमी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे.

गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीजबिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीजबिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीजबिलात १० रुपये सूट देण्यात येणार आहे. ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केले. सुविधेचा लाभ घेण्यासाठी www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीन पर्याय निवडा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com