Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलात १२० रुपयांची सवलत

Paperless Electricity Bil : वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ई-मेल व मेसेजचा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब ग्राहकांचा महावितरणच्या गो-ग्रीन योजनेतील सहभाग सध्या पाच लाखांवर पोचला आहे.
Electricity
Electricity Agrowon
Published on
Updated on

Solapur News : वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ई-मेल व मेसेजचा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब ग्राहकांचा महावितरणच्या गो-ग्रीन योजनेतील सहभाग सध्या पाच लाखांवर पोचला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक दोन लाख एक हजार २३३ ग्राहक योजनेचा लाभ घेत असून, त्यांना दरवर्षी दोन कोटी ४२ लाख रुपयांचा वीजबिलात फायदा होत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ६० हजारांवर ग्राहक आहेत. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी महावितरणने ‘गो-ग्रीन’ योजना सुरू केली. योजनेतून वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर कमी करण्यावर भर आहे.

Electricity
Go Green Scheme Mahavitaran: ‘गो ग्रीन’ योजनेस दोन लाख ग्राहकांची पसंती

कागदी बिलाऐवजी केवळ ग्राहकांना ई-मेल व मोबाईलवर मेसेज असे पर्याय निवडता येतात. त्यातून प्रतिबिलात १० रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वार्षिक १२० रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे.

Electricity
Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’साठी पुढाकार; कागदी बिलाला नकार

विशेष म्हणजे, गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे. पूर्वी ही सवलत प्रत्येकी १० रुपये प्रत्येक बिलामध्ये मिळत होती. आतापर्यंत राज्यातील पाच लाख चार हजार पर्यावरणस्नेही वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले असून, त्यांना सहा कोटी चार लाख ५५ हजार ४०० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.

गो-ग्रीन योजनेचे फायदे...

महावितरणच्या संगणक प्रणालीतून ग्राहकांना नोंदणीकृत ई-मेल किंवा मोबाईलवर मेसेजद्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येते

वीजबिलाच्या तारखेपासून सात दिवसांत बिल भरल्यास एक टक्का सवलत; त्यासाठीही वीजबिल तत्काळ ऑनलाइनद्वारे भरणे सोयीचे झाले आहे

वीज ग्राहकांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येते

महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध असतात

वीज ग्राहकांना आवश्यकतेप्रमाणे वीजबिले कधीही डाउनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची त्यात सोय आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com