GM Maize Variety: पंजाब कृषी विद्यापीठात जीएम मक्याच्या चाचण्या

Punjab Agricultural University: पंजाब कृषी विद्यापीठात जीएम मक्याच्या चाचण्या सुरू असून, त्यामुळे शेतकरी, पर्यावरणवादी संघटना आणि सरकार यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा जैवतंत्रज्ञानावर वादंग उसळण्याची शक्यता आहे.
Punjab Agricultural University
Punjab Agricultural UniversityAgrowon
Published on
Updated on

Pune News: पंजाब सरकार लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर जनुकीय सुधारित अर्थात जीएम मका पिकाच्या चाचण्या घेत आहे. पंजाबचे कृषिमंत्री गुरमीत सिंह खुदियन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत याविषयीची माहिती दिली. त्यामुळे जीएम मक्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

पंजाब कृषी विद्यापीठ योग्य तेच करेल असा विश्वास कृषिमंत्री खुदियन यांनी व्यक्त केला. ‘‘प्रत्येक संकरित वाण काही वर्षांनी कीटकांच्या समस्येला सामोरे जाते. त्यामुळे नवे वाण विकसित करणे गरजेचे असते. कापसापेक्षा मका हे पाणी कमी लागणारे पीक असल्याने कोरडवाहू भागात शेतकऱ्यांसाठी मका चांगला पर्याय ठरू शकतो.’’

Punjab Agricultural University
Maize Cultivation: मराठवाड्यात मक्याची विक्रमी ३ लाख ४८ हजार हेक्टरवर लागवड

श्री. खुदियन म्हणाले, की पंजाब कृषी विद्यापीठात नेहमी संशोधन सुरू असते, यामध्ये प्रक्षेत्र चाचण्यांचा समावेश आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी नवीन वाण तयार करणे आवश्यक आहे.

दरम्यान, पंजाब कृषी विद्यापीठामध्ये होणाऱ्या जीएम मक्याच्या चाचण्या धोका निर्माण करणाऱ्या असून त्या तत्काळ थांबविण्याची मागणी कोएलिशन फॉर जीएम-फ्री इंडिया संघटनेने केली आहे. मात्र जीएम मक्यावरील या आक्षेपांबद्दल काहीही माहिती नसल्याचेही श्री. खुदियन यांनी स्पष्ट केले.

Punjab Agricultural University
Maize Rate: मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज

पंजाबमध्ये ग्लायफोसेट तणनाशक वापरावर बंदी असूनही ग्लायफोसेट वापरण्यात येणाऱ्या जीएम मक्यासाठी पंजाब कृषी विद्यापीठाला ना हरकत प्रमाणपत्र कसे मिळाले, असा सवाल कोएलिशनच्या कविता कुरुगंटी यांनी उपस्थित केला. या जीएम मका वाणाला ग्लायफोसेटसारख्या तणनाशकाला सहन करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या चाचण्या सरकारच्या स्वत:च्या बंदी आदेशांना आणि देशाच्या कीटकनाशक नियंत्रक धोरणालाही छेद देणाऱ्या ठरतात, असे त्यांनी नमूद केले.

जेनेटिक इंजिनिअरिंग मूल्यांकन समितीकडून (जीईएसी) देशातील ११ राज्यांमध्ये चाचण्यांचा विचार करण्यात आला होता. परंतु केवळ पंजाब कृषी विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिला, असे त्यांनी निदर्शनास आणले. तसेच बीटी आणि जीएम यामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

तर पंजाब कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्र चाचण्यांमधील मर्यादित निकषांचे पालन करण्याचा इतिहास खराब आहे. यापूर्वी तणनाशक सहनशील मोहरीच्या चाचण्यांत नियमभंग झाला होता, मात्र त्यावर कारवाई झाली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com