Water Management : पाण्याची मागणी द्या, तत्काळ व्यवस्था करू

Collector Dilip Swami : पुढील सहा ते सात दिवसात त्या टंचाईग्रस्त ठिकाणी पाणी पुरवण्याची सोय केली जाईल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.
Collector Dilip Swami
Collector Dilip SwamiAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : पाणी टंचाई निवारण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावरून उपाययोजना करणे सुरू आहे. पुढील तीन दिवसात कुठल्याही गावात, वाडी, वस्तीवर पाणीटंचाई जाणवत असल्यास ती निवारण्यासाठी मागणीचे पत्र तहसीलला द्या, पुढील सहा ते सात दिवसात त्या टंचाईग्रस्त ठिकाणी पाणी पुरवण्याची सोय केली जाईल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणीटंचाई विषयावर बुधवारी (ता. २२) आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, की जिल्ह्यातील पाणीटंचाई मान्सूनपूर्व नियोजन, खरीप पेरणीपूर्व नियोजन या संदर्भातील बैठका १६ मे पासून सातत्याने सुरू आहेत.

Collector Dilip Swami
Water Management : आले पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन

जिल्ह्यात ६७८ टँकर सुरू असून ४१२ गाव व ६१ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. २८५ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टंचाई निवारण्यासाठी प्रशासन स्तरावरून नियोजन सुरू असले तरी त्यात उणिवा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसात जिल्ह्यातील कुठल्याही गाव, वाडी, वस्तीवर पाणीटंचाई जाणवत असेल,

पाणीटंचाई निवारण्यासाठी असलेल्या उपाययोजनात कमतरता जाणवत असेल तर त्याविषयी ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, आदींनी उपाययोजना संदर्भात मागणीचे निवेदन तहसीलदारांकडे द्यावे. तीन दिवसात आलेल्या निवेदनांचा एकत्रित आढावा घेऊन त्या पुढील तीन ते चार दिवसात पाणीटंचाई निवारण्यासाठी आवश्यक उपाय तत्काळ केले जातील.

Collector Dilip Swami
Amravati Water Issue: अमरावतीत २५ ठिकाणी पाणी पिण्यास अयोग्य; अकोला बुलढाणा, पुणेसह अहमदनगरला वळवाचा तडाखा

तलाठी, ग्रामसेवक यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून टंचाई निवारण्याच्या अनुषंगाने आवश्यक मागणी तहसीलकडे द्यावी. ९ ते १० जूनपर्यंत पाऊस येण्याचा अंदाज असला तरी जून अखेरपर्यंत टंचाई निवारण्याच्या उपाययोजनांची तयारी आपण ठेवत आहोत. आत्ताच्या स्थितीत पाण्याचा उद्भव असलेल्या परिसरात ५०० मीटरपर्यंत दुसरा बोअर, विहीर घेण्याला बंधन घातले आहे.

विविध ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ११९ गावांची निवड केली. त्या गावांमध्ये ३५२१ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी २२४० कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून १२०० कामे पूर्ण झाली आहेत. तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व स्वयंसेवी संस्था यांची सांगड घालून जिल्ह्यात वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याचे काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com