Agriculture GI : कृषी उत्पादनाच्या ‘जीआय’साठी हवी कृषी विभागाची इच्छाशक्‍ती

Agriculture Department : खारपाणपट्ट्यातील हरभरा आणि वनौषधी पानपिंपळीला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळावे, अशी मागणी अंजनगावसूर्जी येथील कार्ड (कम्युनिटी ॲक्‍शन फॉर रुरल डेव्हल्पमेंट) संस्थेने केली आहे.
GI Tagging
GI TaggingAgrowon
Published on
Updated on

Amravati News : खारपाणपट्ट्यातील हरभरा आणि वनौषधी पानपिंपळीला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळावे, अशी मागणी अंजनगावसूर्जी येथील कार्ड (कम्युनिटी ॲक्‍शन फॉर रुरल डेव्हल्पमेंट) संस्थेने केली आहे.

त्याकरिता वर्षभरापूर्वी कृषी विभागाकडे प्रस्तावही दाखल करण्यात आला. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याने माजी कृषिमंत्री व विद्यमान राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी थेट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना याप्रकरणी हस्तक्षेतपाची मागणी केली आहे.

पत्रानुसार, ‘जीआय’मुळे संबंधीत उत्पादनाच्या निर्यातीला चालना मिळण्यास मदत होते. विपणनात सुलभता आणि ‘जीआय’ असलेल्या शेतकऱ्यांना रॉयल्टीच्या माध्यमातून आर्थिक संपन्नताही प्राप्त करता येते. अशा प्रकारचे अनेक फायदे ‘जीआय’चे आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील विस्तारित खारपाणपट्ट्यामध्ये रबी हंगामात हरभरा लागवड होते.

GI Tagging
GIS Mapping : पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचे होणार ‘जीआयएस मॅपिंग’

या भागात उत्पादित होणाऱ्या हरभऱ्याला विशिष्ट खारवटपणा राहतो; त्यामुळेच चवीच्या बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या या हरभऱ्याला उत्तर भारतातून सर्वाधिक मागणी आहे. दिल्ली भागातून व्यापारी हा हरभरा खरेदीसाठी हंगामात गर्दी करतात. त्या पार्श्‍वभूमीवर या हरभऱ्याला ‘जीआय’ मिळाल्यास या भागातील शेतकऱ्यांचे व्यापक हित साधता येणार आहे व हरभऱ्याची विशिष्ट ओळखही कायम राहिल.

GI Tagging
Agriculture GI Rating : राज्यात ‘जीआय’नोंदणीत डाळिंब पहिले

यासोबतच वनौषधी म्हणून देशभरातून मागणी असलेल्या पानपिंपळीचे उत्पादनही अंजनगावसूर्जी, अकोट या भागात होते. त्यालादेखील मागणी आहे. परिणामी या दोन्ही पिकांना ‘जीआय’ मिळावे, अशी मागणी आहे. त्याकरिता सुरुवातीला जिल्हा नियोजन समितीने निधीची उपलब्धता करावी, असे प्रस्तावित होते.

कृषी विभागाच्या माध्यमातून हा शेतकरी हिताचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. परंतु आजवर त्याचा अपेक्षित पाठपुरावा झाला नाही. याची दखल घेत या दोन्ही पिकांना ‘जीआय’ मिळेल याकरिता कारवाई व्हावी, अशी मागणी कृषिमंत्री सत्तार यांच्याकडे करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com