Jowar Hurda : गावरान आंबट-गोड, आरोग्यदायी ज्वारीचा हुरडा; शेतकऱ्यांना ठरतोय आर्थिक हातभार

Gavran Jowar Hurda : महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील अनेक भागात ज्वारीचे पीक घेतले जाते. ज्वारीचा वापर प्रामुख्याने धान्य व जनावरांसाठी कडबा म्हणून केला जातो.
Jowar Hurda
Jowar Hurdaagrowon
Published on
Updated on

Healthy Jowar Hurda : राज्यातील विविध भागात रब्बी ज्वारीचे पीक घेतले जाते, ज्वारीचा वापर प्रामुख्याने धान्य व जनावरांसाठी कडबा म्हणून केला जातो. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबींवर अवलंबून असते. दरम्यान, थंडीच्या दिवसात ज्वारीचे दाणे हिरवट दुधाळ अवस्थेत असतात. या अवस्थेतील दाणे भाजल्यास अतिशय चवदार, मऊ आणि गोडसर लागतात याला ज्वारीचा हुरडा म्हणतात. हिरव्या दाण्यांचा हुरडा अतिशय चांगला आणि आरोग्यास फायदेशिर असतो.
कृषी विद्या विभागाचे सुरेश साळुंखे यांनी सांगितले की, "हुरड्याच्या दाण्यात ०८ ते १०% आर्द्रता, ९.४ ते १०.४% प्रथिने, तंतुमय पदार्थ १.२ ते १.६%, खनिज द्रव्य १.० ते १.६%, कॅल्शिअम २९ मिलिग्रॅम, कॅरोटीन ४७ मिलिग्रॅम, थायमिन ३७ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम या प्रमाणात असते".

सोलापूर परिसरात हुरडा पार्ट्या जोमात

सोलापूर जिल्ह्यात ज्वारीची पेरणी लवकर झाल्याने महामार्गावर शहरी ग्राहकांच्यासाठी हुरडा विक्रीसाठी आणला जात आहे. शेतावर व्यावसायिक दृष्टिकोनातून नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ज्वारी हुरडा पार्टी आयोजित केल्या जातात. एका हेक्टरमधील ज्वारीच्या हुरड्यापासून किफायतशीर आर्थिक उत्पन्न मिळत असल्याचे मत मंगळवेढा तालुक्यातील मरवड्याचे शेतकरी संदीप सुर्यवंशी यांनी सांगितलं.

हुरड्याचे आहारातील महत्त्व

ज्वारीचा हुरडा आपल्या शरिराला गुणकारी आहे. यापासून आपली पचनशक्ती सुधारते, ह्रदय रोग्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते, भूक वाढवते, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. पचनसंस्थेतील वायुदोष घालवण्यासाठी ऍसिडिटी शमविण्यासाठी, आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच शौचास साफ व व्यवस्थित होण्यासाठी मदत होते.

Jowar Hurda
Jowar Farming : ज्वारी पीक झाले कोळगिरीचा आधार

हुरड्याचे आहारातील महत्त्व

ज्वारीचा हुरडा आपल्या शरिराला गुणकारी आहे. यापासून आपली पचनशक्ती सुधारते, ह्रदय रोग्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते, भूक वाढवते, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. पचनसंस्थेतील वायुदोष घालवण्यासाठी ऍसिडिटी शमविण्यासाठी, आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच शौचास साफ व व्यवस्थित होण्यासाठी मदत होते.

ज्वारीपासून हुरडा, रवा, पोहे ,घुगऱ्या दशमी, दशमी ,थालीपीठ, उत्तप्पा, डोसा इडली, कुरडई, चकली, अप्पे, चिवडा, खाकरा, भातवड्या, पापड, आंबिल, मसाल्याचे वडे, शेव, पापडी, बिस्कीट, कुकीज, केक, शंकरपाळी, नानकटाई, मीटिंग मोमेंट, बेवड्या, सिरप किंवा काकवी, गूळ आणि अल्कोहोल अशा अनेक मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याच्या पद्धती विकसित झाल्या आहेत.

हुरड्याची निर्मिती

"हुरड्याच्या दाण्यांमध्ये मुक्त अमिन आम्ल, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्वे यांचे प्रमाण अधिक असून पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. दाण्यास एक प्रकारची स्वादिष्ट चव प्राप्त होते. तयार हुरड्यामध्ये लिंबू, मीठ, साखर, तिखट, मसाला दही आणि गूळ यासारखे पदार्थ वापरून त्याची चव वाढवता येते. खास हुरड्यासाठी गोडसर, रसाळ आणि भरपूर दाणे असणारी फुले मधुर या वाणाची शिफारस संशोधन केंद्रामार्फत करण्यात आली आहे. सध्या ज्वारीच्या हुरड्याची लोकप्रियता वाढत चालली आहे". असे फलटण कृषीमहाविद्यालयाचे डॉ. उत्तम चव्हाण यांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com