Cooperative Elections : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा लागणार ब्रेक?

Cooperative Elections Delay : सहकारी संस्थांच्या निवडणुकांनी गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत राजकारण ढवळून निघते. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुकांना महत्त्व आहे.
Cooperative Societies Elections
Cooperative Societies Electionsagrowon
Published on
Updated on

Maharashtra Cooperative Elections : यंदाच्या वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत गेल्या. परंतु, नवीन वर्षात सहकारातील निवडणुकांचा बिगुल वाजणार की नाही, याबाबत अद्यापही संभ्रमावस्था आहे. आतापर्यंत तीन वेळा थांबलेल्या निवडणुकांची स्थगिती ३१ डिसेंबरला उठणार आहे; मात्र नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यास पुन्हा एकदा त्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सहकारातील संस्थांच्या निवडणुका नक्की होतील की पुन्हा एकदा स्थगिती मिळणार याकडे सहकारी संस्था चालकांचे लक्ष लागून आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुकांनी गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत राजकारण ढवळून निघते. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुकांना महत्त्व आहे. या संस्था जिल्ह्यातील राजकारण बदलण्यास कारणीभूत ठरतात. या निवडणुका गतवर्षीच होणे अपेक्षित होते. लोकसभा निवडणुकीमुळे पहिल्या टप्प्यात, अतिवृष्टीमुळे दुसऱ्या टप्प्यात, तर विधानसभा निवडणुकीमुळे तिसऱ्या टप्प्यात या निवडणुकांना स्थगिती मिळाली.

Cooperative Societies Elections
Amit Shah : सेंद्रिय शेतमालाची जगभरात 'भारत ऑरगॅनिक्स' ब्रँडच्या नावाखाली होणार विक्री

सहकारी संस्थांतील निवडणुकांना स्थगिती देण्याचे अधिकार सरकारचे आहेत. सहकारी संस्थांमध्ये राजकीय व्यक्तींचे हितसंबंध आहेत. अनेक संस्था त्यांच्या नावाने, वर्चस्वाने ओळखल्या जातात. ‘क’ आणि ‘ड’ स्तरावरील कार्यकर्त्यांना या संस्थांमध्ये पदे देण्यासाठी आमदार-खासदारांपर्यंत वर्चस्वाचा वाद दिसून येतो. त्यामुळे या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वर्षात तीन वेळा ब्रेक मिळालेल्या निवडणुकांची स्‍थगिती ३१ डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात गाव, तालुका पातळीवर सहकारी संस्थांमध्ये सोसायट्यांसह अन्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असे नियोजन सुरू असतानाच पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे याला स्थगिती मिळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा, अशा सूचना प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी दिल्याने पुन्हा सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com