Stormy Rain : गणेगावला वादळासह पावसाचा फटका

Rain Update : गणेगाव दुमाला, तांदळी, मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरात बुधवारी (ता. २२) दुपारी चारच्या दरम्यान वादळी वारे व मुसळधार पावसाने हजेरी लावली.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Andhalgaon News : गणेगाव दुमाला, तांदळी, मांडवगण फराटा (ता. शिरूर)  परिसरात बुधवारी (ता. २२) दुपारी चारच्या दरम्यान वादळी वारे व मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला.

गणेगाव दुमाला येथील सुरेश बाजीराव मोरे, अंकुश जगताप यांच्या घरावरील पत्रे व प्रकाश दत्तात्रेय काकडे यांच्या जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडून नुकसान झाले. तांदळी व माळवाडी परिसरात वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब व झाडे कोसळली.

Rain Update
Heavy Rain : शिराळ्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

माळवाडी येथे शेतकऱ्याच्या मोटरसायकलवर झाड कोसळल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गणेगाव परिसरात शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गणेगाव दुमालाचे सरपंच तुकाराम निंबाळकर यांनी केली आहे.

विहिरीवरील सोलर पॅनेलचे नुकसान

गणेगाव दुमाला येथील शेतकरी सुखदेव शिवाजी निंबाळकर यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेल्या कृषी पंपाच्या सौर पॅनलचे वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. वादळाची तीव्रता इतकी जास्त होती की सौर पॅनेल शंभर फूट दूर उडून पडले.

Rain Update
Stormy Rain : वादळाने कुटुंबे उघड्यावर

पंचनाम्याला बगल दिल्याने शेतकरी नाराज

गणेगाव दुमाला येथे दोन वेळा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे, गोठ्यावरचे पत्रे तसेच कांदा चाळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.याचे पंचनामे होत नाही तोच पुन्हा एकदा बुधवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान केले आहे.गुरुवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुट्टी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतानाही अधिकाऱ्यांनी सुटीचे कारण सांगत पंचनाम्याला बगल दिल्याने शेतकरी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

विद्युत खांब कोसळल्याच्या घटना

गणेगाव दुमाला येथे वादळी वाऱ्यासह दोनदा पावसाने हजेरी लावली. यामध्ये महावितरण कंपनीची तांदळी रोड ते नाथाचीवाडी परिसरातील विद्युत तारा जमीनदोस्त झाली होती. त्याची दुरुस्ती सुरू असतानाच पुन्हा एकदा बुधवारी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याच्या घटना घडल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com