Heavy Rain : शिराळ्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

Rain Update : शिराळा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, शिराळा तालुक्यात गुरुवारी (ता. २३) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वाकुर्डे बुद्रुक येथे अनेक घरे व गोठ्यांचे पत्रे व छप्पर उडून गेले.
Rain Update
Rain Update Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे धूळ वाफेवरील भात पेरणीसाठी शेतकरी पुढे आले आहेत. दरम्यान, शिराळा तालुक्यात गुरुवारी (ता. २३) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वाकुर्डे बुद्रुक येथे अनेक घरे व गोठ्यांचे पत्रे व छप्पर उडून गेले. वाकुर्डे ते येळापूर दरम्यान मुख्य रस्त्यावर बादेवाडी येथे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. झाडे विद्युत तारेवर पडल्याने तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. शेतकरी, महावितरणचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

Rain Update
Heavy Rain : पावसाने तिघांचे बळी

सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा या परिसरासह अन्य भागात गुरुवारी (ता. २३) रात्री उशिरा पूर्व मोसमी जोरदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ऊस पिकासाठी उपयुक्त ठरत आहे. हळद लागवड करण्यासाठी शेतकरी येत्या आठवड्यात नियोजन करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. तर खरीप हंगामातील पिकांची पेरणी, टोकणी करण्यासाठी पूर्व मशागती उरकण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत.

शिराळा उत्तर भागात वाकुर्डे परिसरात ढगांचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. धनाजी नाना शेटके यांच्या घरावरील छप्पर उडून गेल्याने त्यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य भिजले आहे. गोरख विठ्ठल शेटके यांच्या जनावरांच्या शेडचा पत्रा तर युवराज सुदाम गुरव यांच्या घराचे छप्पर उडून गेले आहे. सीताराम शेटके यांच्या सुमारे एक एकरातील पावटा पिकाचे नुकसान झाले.

Rain Update
Heavy Rain : सिंधुदुर्गात किनारपट्टीसह सर्वत्र मुसळधार पाऊस

पश्चिमोत्तरमध्ये भुईमूग पीक काढणीला आले आहे. चार-पाच दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या भुईमूग पिकाचे मोठे नुकसान होतेय. पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

तालुक्यात २०८ ठिकाणी नुकसान

शिराळा तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याने घरे व गोठे मिळून २०८ ठिकाणी नुकसान झाले. तहसीलदार शामला खोत-पाटील यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महावितरण कंपनीचे कोकरूड ते मणदूर दरम्यान सुमारे ४० वीज खांब वाकले व पडले. काही ठिकाणी तारा पडल्याने सुमारे साडे सात लाखांचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com