Stormy Rain : वादळाने कुटुंबे उघड्यावर

Pre Monsoon Rain : सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. मंगळवारी (ता. २१) घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. मंगळवारी (ता. २१) घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय आंबा, काकडी, चारा पिकांनाही मोठा फटका बसला आहे. घरांचे नुकसान झाल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

वादळी वाऱ्याने आणि पावसाचा तडाखा अतिशय जोरात बसल्याने जनावरांच्या पाठीवर जखमा झाल्या आहेत. घरांवरील पत्रेही उडाले आहेत. सातारा, फलटण, वाई, पाटण, खटाव, महाबळेश्‍वर तालुक्यांतील अनेक गावांना पावसाने झोडपले आहे. सातारा तालुक्यातील अतित, काशीळ परिसरात दमदार पाऊस झाला.

Rain Update
Heavy Rain : सिंधुदुर्गात किनारपट्टीसह सर्वत्र मुसळधार पाऊस

वाई तालुक्यातील पश्‍चिम भागात पांडेवाडी येथे झालेल्या अवकाळी पावसाने संतोष शिंदे यांच्या घराची भिंत नामदेव गणपती शिंदे (वय ७०) यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची सून व नातू हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

वाई तालुक्यातील पश्‍चिम भागात पांडेवाडी येथे झालेल्या अवकाळी पावसाने संतोष शिंदे यांच्या घराची भिंत नामदेव गणपती शिंदे (वय ७०) यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची सून व नातू हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Rain Update
Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

फलटण तालुक्यातील तरडगाव परिसरात अनेक घरांचे पत्रे उडाले. गोठ्यांच्या भिंती पडल्या. लिंबाची झाडे उन्मळून पडली. यामध्ये सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. खटाव तालुक्यातील निढळ परिसरातही मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडली.

काही घरांचे पत्रे उडून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. रस्त्याच्या कडेला झाडाखाली लावलेल्या वाहनांवर झाडे पडून नुकसान झाले. आरडगावातील घराचे छप्पर उडाले. आरडगाव वादळी पावसाचा येथील अनेक घरांना फटका बसला. फलटण तालुक्यातील आरडगाव परिसरात सोमवारी वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले. काही घरांच्या भिंती पडल्या.

आठवडाभरापासूनच्या पावसाने दाणादाण

गेल्या आठ- दहा दिवसांपासून सातत्याने सायंकाळच्या वेळेस वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडत आहे. भाजीपाला, फळबागांचेही मोठे नुकसान झाले. या वर्षी जिल्ह्यात वीज पडून तरुणांसह अनेकांना प्राण गमवावे लागले. जावळी तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून रोजच पावसाच्या सरी कोसळत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com