Gadhinglaj Sugar Factory : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या कामगारांना न्याय मिळणार? साखर सहसंचालकांनी काढला आदेश

Joint Director Sugar : तक्रारींच्या अनुषंगाने चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देऊनही डी. बी. पाटील यांनी अद्याप कारखान्याची चौकशी केलेली नाही.
Gadhinglaj Sugar Factory
Gadhinglaj Sugar Factoryagrowon

Appasaheb Nalavade Sugar Factory : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी केलेल्या विविध तक्रारींची चौकशी करून आठ दिवसांत अहवाल द्यावा, असा आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी दिले आहेत. द्वितीय विशेष लेखापरीक्षक डी. बी. पाटील यांना हे आदेश दिले आहेत.

निवृत्त कामगारांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या नावे असलेले निवेदन दिले. त्यात चाचणी लेखापरीक्षणासाठी पोलिस कारवाईद्वारे कारखान्याचे दप्तर ताब्यात घ्यावे, सभासदांना सवलतीची साखर मिळावी आणि कारखाना कामगार सेवकांची पतसंस्था व सोसायटीची चौकशी करून कामगारांना सोयी, सवलती मिळाव्यात, या मागण्या केल्या आहेत.

यापूर्वी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देऊनही डी. बी. पाटील यांनी अद्याप कारखान्याची चौकशी केलेली नाही. त्यांना कारखाना दप्तर उपलब्ध करून देत नसल्याचे पाटील यांनी वरिष्ठांना सांगितल्याचे कळते.

यामुळे पोलिस कारवाईने दप्तर उपलब्ध करून द्यावे. कारखाना कामगार पतसंस्था व सोसायटीचे दोन ते तीन कोटी रुपये देणे लागते. त्या पतसंस्थेची चौकशी करून सभासद व कामगारांना पूर्वीप्रमाणे सवलती मिळाव्यात, या तक्रारींच्या चौकशीसाठी मावळे यांनी पुन्हा पाटील यांची नेमणूक केली आहे.

Gadhinglaj Sugar Factory
Gadhinglaj Sugar Factory : जिल्हा बँकेने अर्थसहाय्य करूनही गडहिंग्लज साखर भाडेतत्त्‍वाच्या वाटेवर

शिष्टमंडळात निवृत्त कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजी खोत, रणजित देसाई, आप्पासाहेब लोंढे, महादेव मांगले, सुरेश पाटील, बबन पाटील, लक्ष्मण देवार्डे, दिनकर खोराटे, रामा पालकर, अशोक कांबळे, सदाशिव कांबळे, राजू कोकीतकर, आदींचा समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com