Gadhinglaj Sugar Factory : जिल्हा बँकेने अर्थसहाय्य करूनही गडहिंग्लज साखर भाडेतत्त्‍वाच्या वाटेवर

Bricks India Company : कारखाना आर्थिक अडचणीत आल्याने २०१३ पासून ब्रिस्क कंपनीकडे भाडेतत्त्‍वाने चालविण्यासाठी दिला.
Gadhinglaj Sugar Factory
Gadhinglaj Sugar Factoryagrowon

Kolhapur Gadhinglaj Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) पुन्हा एकदा चालवायला देण्याचा विचार चालू असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी (ता. १८) रोजी संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आळी आहे यात काढलेल्या नोटिसीत या विषयावर चर्चा होणार आहे. गोडसाखर कारखान्याला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७५ कोटींचे अर्थसहाय्य करूनही अचानक कारखाना चालवायला देण्याचा मुद्दा समोर आल्याने तालुक्यात याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कारखाना आर्थिक अडचणीत आल्याने २०१३ पासून ब्रिस्क कंपनीकडे भाडेतत्त्‍वाने चालविण्यासाठी दिला. दहा वर्षांची मुदत असताना आठ हंगाम पूर्ण करून कंपनीने कारखाना सोडला. त्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने २०२१-२२ चा हंगाम सुरू करण्यास अर्थसाहाय्‍य उपलब्धतेसाठी सुरू केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले.

अखेर तत्कालीन अध्यक्ष कै. श्रीपतराव शिंदे व त्यांच्या समर्थक संचालकांनी तालुक्यातून विविध संस्था व वैयक्तिक ठेव गोळा करून कारखाना स्वबळावर सुरूही केला. दरम्यान, अंतर्गत वादामुळे १२ संचालकांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त झाले. यामुळे कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाली.

दरम्यान, प्रशासकांनी कारखाना चालविण्यास देण्याची दोनवेळा निविदा प्रसिद्ध केली. परंतु, त्यासाठी कोणतीच कंपनी पुढे आली नाही. त्यानंतर झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता मिळविली. डॉ. प्रकाश शहापूरकर अध्यक्ष झाले.

मुश्रीफ यांनी केडीसीसीच्या माध्यमातून कारखान्याला पहिल्या टप्प्यात ५५ कोटींचे अर्थसहाय्‍य दिले. मशिनरी दुरुस्तीसाठी मोठा अवधी लागल्याने कारखान्याचा २०२३-२४ चा हंगाम उशिरा का होईना स्वबळावर सुरू झाला. यामुळे निवडणुकीत स्वबळावर कारखाना चालविण्याचे सभासदांना दिलेले आश्वासन पूर्ण झाले.

Gadhinglaj Sugar Factory
KDCC Bank Raju Shetti : राजू शेट्टींनी मागवलेल्या माहितीचा जिल्हा बँकेकडून खुलासा, अकरा कारखान्यांची माहिती समोर

हंगामाच्या अंतिम टप्प्यात उत्पादकांसह तोडणी-ओढणीची बिले देण्यासाठीही केडीसीने २० कोटींचे अर्थसहाय्य दिले. त्यानंतर अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांनी एका ट्रस्टकडून ३०० कोटींचे अर्थसहाय्य घेण्याचा विषय संचालकांच्या बैठकीत आणला. त्याला एकमताने मंजुरीही मिळाली. दरम्यान, स्वबळासाठी केडीसीसीने मोठे अर्थसहाय्याचे पाठबळ देऊनही आता पुन्हा कारखाना चालवायला देण्याच्या विषयावर सभासद व उत्पादकांत जोरात चर्चा सुरू झाली आहे.

बैठकीसमोर दोनच विषय

शनिवारी (ता. १८) दुपारी तीन वाजता कारखाना सभागृहात होणाऱ्या संचालक मंडळाच्‍या बैठकीसमोर दोन विषयांची नोटीस सचिवांच्या सहीने काढली आहे. कारखाना चालवण्यास देणे व अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या ऐनवेळच्या विषयावर चर्चा करणे असे दोनच विषय आहेत. यातील कारखाना चालवण्यास देण्याचाच मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येणार आहे. त्यावर कोणता निर्णय होणार, याकडे आता तालुक्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com