Gokul Milk Kolhapur : पशू महाविद्यालयाच्या मुद्दावरून 'गोकुळ'ची सभा गाजणार? शौमिका महाडिकांची सत्ताधाऱ्यांवर आगपाखड

Shoumika Mahadik : गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत गोकुळच्या काही ठरावांना विरोध दर्शवला आहे.
gokul milk kolhapur
Gokul Milk KolhapurAgrowon
Published on
Updated on

Gokul Milk Kolhapur : गोकुळ दूध संघात पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास माझा विरोध आहे. महाविद्यालयाचा हा घाट कोणी आणि कशासाठी घातला आहे? हा शोध घेतला पाहिजे महाविद्यालयासाठी खर्च गोकुळ करणार, गोकुळचे पैसे यात विनाकारण अडकून राहितील. व्यावस्थापन, जागा, बांधकाम याचा सगळा खर्च सभासद आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांवर येणार असल्याचे म्हणत गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी विरोध केला.

गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. ३०) रोजी पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत गोकुळच्या काही ठरावांना विरोध दर्शवला आहे. गोकुळमधील सत्ताधारी आपल्याला सभेमध्ये प्रश्न विचारू देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मला गोकुळ मोठा झालेला बघायचा आहे. संघांचे भले व्हावे यासाठी माझा विरोध आहे. पण संघातील सत्ताधारी काही चुकीचे निर्णय घेत असतील तर माझा विरोध कायम राहिल असे महाडिक म्हणाल्या.

गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये महाविद्यालयाच्या मुद्दावरून सभा गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सभेपुढील असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि ५० लिटर दूध अट रद्द करण्यास विरोध केला आहे. उद्याच्या सभेत सन्मानाने आमच्या प्रश्नांचे निरसण केल्यास आम्ही विरोध करणार नाही परंतु सत्ताधाऱ्यांनी आम्हाला गृहीत न धरता निर्णय घेतल्यास आमचा विरोध राहिल असे महाडिक म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, अ संस्था सभासद दर्जा मिळवण्यासाठी असणारी दररोज किमान ५० लिटर दूध संस्थेस घालणे ही अट रद्द करण्यास आमचा विरोध राहणार आहे. मागच्या ५ वर्षात सत्ताधाऱ्यांनी दूध संस्था वाढवल्या पण दूध संकलन वाढण्यात ते अपयशी ठरल्याचे अहवालातील आकडेवारीनुसार दिसून येत आहे. ही अट रद्द करून तुम्ही बोगस मतदार तयार करत आहात का असा सवालही महाडिक यांनी केला.

gokul milk kolhapur
Gokul Dudh Sangh : सर्व प्रश्नांची उत्तरे देणार गोकुळ अध्यक्ष अरूण डोंगळेंचा शब्द, शौमिका महाडिक काय घेणार भूमिका?

मार्केटिंगच्या अधिकाऱ्याचे हट्ट आणि लाड का?

यापूर्वी गोकुळ मधून सेवानिवृत्त झालेल्या जगदीश पाटील या अधिकाऱ्याला पुन्हा एकदा गोकुळने पदावर बसवले आहे. इतकेच नव्हे तर दरमहा अडीच लाख पगार देण्यात येतो. पण या अधिकाऱ्याला घेण्यास कोणी हट्ट धरला. शिवाय इतका पगार देऊन मार्केटिंग करण्यास त्याचे योगदान काय? असा सवाल शौमिका महाडिक यांनी केला.

मुंबईतील संकलनात घट

जिल्हा दूध संघाकडून मुंबई आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री होत असते परंतु मागच्या काही वर्षात दूध विक्रीत घट असल्याची बाब शौमिका महाडिक यांनी आकडेवारीनुसार मांडली. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री करण्यात गोकुळ इतर दूध संस्थांच्या बाबतीत का मागे पडत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जगदीश पाटील या कर्मचाऱ्याची व्यवसाईक सल्लागार म्हणून विशेष नियुक्ती करूनही गोकुळ मागे पडत आहे याचा अर्थ संस्थेच्या कामकाजात गैरप्रकार असल्याचे दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com