PDCC Bank
PDCC Bank Agrowon

PDCC Bank : पुणे ‘पीडीसीसी’कडून नवनवीन योजनांसाठी वित्तपुरवठा

Pune District Central Co-Operative Bank Ltd : जिल्हा बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला माती परीक्षणाचा फायदा मिळणार आहे. शेतीच्या नवनवीन योजनांसाठी पुणे जिल्हा बॅंकेतून वित्त पुरवठा करण्यात येणार आहे.

Pune News : जिल्हा बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला माती परीक्षणाचा फायदा मिळणार आहे. शेतीच्या नवनवीन योजनांसाठी पुणे जिल्हा बॅंकेतून वित्त पुरवठा करण्यात येणार आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व नारायण गाव कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने माती-पाणी परीक्षण कार्यशाळा व शेतकरी संवाद मेळावा पौड येथे मंगळवारी (ता.९) आयोजित केला होता. या वेळी माजी जिल्हा परिषद सभापती जनाबाई ईप्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आनंदा घोगरे, महादेव मरगळे, मार्केट कमिटी संचालक राम गायकवाड, माऊली कांबळे, रमेश नांगरे, शंकरराव मारणे, संतोष साठे, रामचंद्र देवकर, माऊली माझिरे, नाना घारे, अनंता ढमाले, राजेंद्र मारणे उपस्थित होते.

PDCC Bank
PDCC Bank Pune : ‘पीडीसीसी’कडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अर्थसाह्य

उपाध्यक्ष श्री. चांदेरे म्हणाले, की माणसाचे आरोग्य तपासताना रक्तातील विविध घटक तपासले जातात. त्यातून शरीरातील अनेक घटकांची माहिती मिळते. त्याचप्रमाणे शेतीचे आरोग्य माती व पाणी परीक्षणातून कळते.

जमिनीला नेमके काय पहिजे, हे कळण्यासाठी मातीतील नत्र, स्फुरद, पालाश, इतर घटक यांची माहिती परीक्षणातून मिळाली की त्यावरून कोणती खते, औषधांची मात्रा किती द्यावी हे समजले जाते. त्यानुसार जमिनीचे, शेतीचे आरोग्य सुधारून उत्तम व निरोगी पीक मिळते.

कृषी विज्ञान केंद्राचे मृदा विषयतज्ञ योगेश यादव म्हणाले, की माती हा शेतजमिनीचा आत्मा आहे. मातीचे आरोग्य बिघडल्याने मानवाला अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. जमिनीचे आरोग्य सुधारल्यास मानवी जीवन सुखकर होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी मातीपरीक्षण करणे नितांत गरजेचे आहे. कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ धनेश पडवळ यांनी प्रास्ताविक केले. कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com