
Mumbai News: राज्यात एक हजार रुपयांच्या आत पीक विमा भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांना तफावतीपोटी किमान एक हजार रुपये विमा रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपये पीकविमा कंपन्यांना वितरित केले आहे. रब्बी २०२३-२४ च्या हंगामातील तफावतीकरिता ४ कोटी, ७४ लाख, १२ हजार रुपयांची गरज होती. मात्र, राज्य सरकारकडे निधीच नसल्याने तोकड्या रकमेवर बोळवण केली आहे.
२०१९ मध्ये काढण्यात आलेल्या आदेशानुसार, कंपन्यांनी एक हजार रुपयांच्या आता कमी विमा दिल्यास उर्वरित भार राज्य सरकारने उचलून किमान एक हजार रुपये भरपाई देणे बंधनकारक होते. मात्र, राज्य सरकारने २०२३ पासून ही रक्कम दिलेली नव्हती. दोन दिवसांपूर्वी २०२३ च्या खरीप आणि २०२४ च्या रब्बी हंगामातील ३ लाख ६०३ शेतक-यांना १० कोटी रुपये वितरित करण्यासाठी रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
२०२३-२४ च्या रब्बी हंगामातील तफावतीपोटी ४ कोटी ७४ लाख १२ हजार, ७५८ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्याने नसल्याने केवळ ९३ लाख ४२ हजार रुपये देण्यात आले आहेत.
राज्यात २०१६ पासून पीकविमा योजना राबविण्यात येते. मात्र, या योजनेतील त्रुटींमुळे आणि कंपन्यांच्या हेकेखोरपणामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना भरपाईपोटी १००, १५० किंवा शेकड्यातील रक्कम मिळत होती. शेतकऱ्यांची ही एक प्रकारे थट्टा होती. त्यामुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठत होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्याची रक्कम किमान एक हजार रुपयांपर्यंत अदा करण्यात यावी. तसेच त्यापेक्षा कमी रक्कम येत असेल तर तफावतीची रक्कम राज्य सरकारमार्फत देण्यात यावी, असे आदेश काढले होते.
खरीप २०२३ मध्ये एक हजार रुपयांच्या आता भरपाई मिळालेल्या २ लाख १३ हजार, ५२९ शेतकऱ्यांना २१ कोटी, ३५ लाख २९ हजार रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली होती. तर विमा कंपन्यांनी १२ लाख २८ हजार ७१ लाख २८२ रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली होती. त्यामुळे तफावतीपोटी द्यायची रक्कम ९ कोट ६५ लाख, ५७ हजार, ७१८ रुपये वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
रब्बीतील तफावतीसाठी पैसे नाहीत
२०२३-२४ च्या रब्बी हंगामातील ८७ हजार ७४ शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते. त्यांची देय नुकसानभरपाई ८ कोटी ७० लाख, ७४ हजार रुपये होती. तर ११० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान भरपाईपोटी विमा कंपन्यांना ३ कोटी ९६ लाख ६१ हजार २४२ रुपये देण्यात आले. तर तफावतीपोटी ४ कोटी ७४ लाख १२ हजार, ७५८ रुपये विमा कंपन्यांकरवी शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते.
मात्र, केवळ ९३ लाख ४२ हजार, २८२ रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. ४ कोटी ७४ लाख, १२ हजार, ७५८ कोटी रुपये वितरणाची मागणी आयुक्त कार्यालयाने पत्राद्वारे राज्य सरकारकडे केली होती. मात्र, लेखाशीर्षांतर्गत शिल्लक असलेल्या निधीच्या मर्यादेत रक्कम वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.