Agribusiness Success: दुःख सारून मायलेकींनी फुलवली निर्यातक्षम डाळिंब बाग

Women Empowerment: पती आणि मुलाच्या निधनाने कोसळलेल्या दुःखाचा भार बाजूला ठेवून, नाशिकच्या एका मायलेकींनी शेतीत स्वतःला झोकून दिले. त्यांनी निर्यातक्षम डाळिंब उत्पादनातून आर्थिक स्थैर्य मिळवले आणि संघर्षाच्या वाटेवर यशाची नवीन कहाणी लिहिली.
Success Story
Success StoryAgrowon
Published on
Updated on

Nashik News: २०१० मध्ये एकुलत्या एक मुलाचे अकाली, तर पुढे २०१३ मध्ये पतीचे निधन झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. मुलगा व पती गेल्याने ती एकटी पडली. दुःख पोटात घालून जगत असताना मुलगी कौटुंबिक कारणामुळे माहेरी आली. त्यातून जगण्याचा संघर्ष आणखी वाढला. मात्र आता रडण्यापेक्षा लढलेले बरे असे मायलेकींनी ठरवले. डोंगराएवढे दुःख पचवून दोघींनी शेतात निर्यातक्षम डाळिंब बाग फुलवली. ही संघर्षमय कहाणी आहे, आखातवाडे (ता. बागलाण) येथील आई जिजाबाई व मुलगी रोहिणी ह्याळीज यांची.

Success Story
Agriculture Success Story: अळिंबी बीज उत्पादनाने बदलले भविष्य – मेघालयातील तरुणाचा यशस्वी प्रयोग!

जगण्यासाठी हाताला काम हवे म्हणून जिद्दीने मायलेकींनी कुटुंबाची ३ एकर शेती कसायला घेतली. सुरुवातीला मका, कांदा अशी पारंपरिक पिके त्या घेत. मात्र उत्पन्न मर्यादित होते. रोहिणी कला शाखेत पदव्युत्तर पदवीधारक होती. तिने अभ्यास करून पारंपरिक पीकपद्धतीला पर्याय देत फलोत्पादनाचा अभ्यास केला. त्यातूनच डाळिंबासंबंधी सुधारित लागवड, वाण, खत-सिंचन व कीड-रोग व्यवस्थापन समजून घेतले. त्यातूनच पुढे टप्प्याटप्याने २ एकर क्षेत्रावर ‘आरक्ता’ या डाळिंब वाणाच्या ७५० झाडांची लागवड केली आहे. याकामी आई जिजाबाई हिची समर्थ साथ लाभली. म्हणूनच संघर्षमय वळणावर त्यांची जिद्द कष्टातून सिद्ध झाली आहे.

पती दशरथ पोलिस खात्यातून सेवानिवृत्त होते. तर मुलगा अविनाश शिक्षक होता. तरुण मुलगा गेल्याने शोकसागरात असलेल्या वडीलांचे पुढे निधन झाले. या सुखी परिवाराला दृष्ट लागली. असे असताना जीवनात मुलगी रोहिणी व आई जिजाबाई एकमेकींसाठी आधार झाल्या. परिस्थितीशी दोन हात करून शेतीत प्रयोगशीलतेने काम करत गेल्या ९ वर्षांत संघर्ष कायम ठेवला आहे.

Success Story
Agriculture Success Story: शेतीतील नवा प्रयोगशील मार्गदर्शक: अभिजित घुले यांची यशोगाथा

डाळिंब लागवड केल्यानंतर पुढे दुष्काळाच्या सावटात बाग जगविण्याचे संकट उभे ठाकले. त्यावर मात करण्यासाठी कूपनलिका खोदून पाणी उपलब्ध केले. ते विहिरीत साठवून प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब बाग जगविली. एकीकडे तेलकट डाग, मर अशा रोगांमुळे कसमादे भागातील डाळिंब क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले. मात्र मायलेकींनी बागा जगवून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यात सातत्य ठेवले आहे. आज मुलगा नाही; मात्र जिजाबाई त्यांच्या तीनही मुली मनीषा, रोहिणी, वैशाली या खऱ्या अर्थाने आदर्श कन्या अशाच आहेत.

स्वकर्तृत्वाने सबला म्हणून त्यांचा ठसा

रोहिणी आशा पर्यवेक्षिका म्हणून सेवा देतात. शिवाय शेतीत आईच्या सोबतीने राबतात. हंगामी छाटणी, पानगळ, खते देणे, फवारण्या, तणनियंत्रण, सिंचन अशी कामे नियोजनपूर्वक करतात. म्हणून २०२० पासून गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादन त्या घेत आहेत. शेतीत राबताना अनेक संकटे येतात, मात्र त्यावर उपाय शोधून पुढे जात आहेत. दोघींच्या कष्टातून रोजगाराचा प्रश्‍न तर मिटला शिवाय अर्थकारणही सुधारले. गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादनामुळे व्यापाऱ्यांकडून मालाला पसंती मिळते. त्यामुळेच शेतीत राबताना मायलेकींचा सबला म्हणून ठसा उमटला आहे. हा संघर्षमय प्रवास महिलांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com