घरी चार ट्रॅक्टर, यंत्र; पण सारी कामे बैलांनीच

आताच युग यंत्र व तंत्रज्ञानाचे. त्याला शेतीही अपवाद नाही. परंतु यंत्र आणि तंत्रज्ञानाचा वापर नेमका किती करायचा, या विषयीची एक भूमिका महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबीयांनी घेतली आहे.
Agriculture
AgricultureAgrowon

बीड : उन्हाळ्यात मशागतीची (Summer Agriculture Work) सारी कामे ट्रॅक्टरने, परंतु जूनमध्ये पाऊस पडला आणि जमीन ओली झाली, की तिथून पुढची पेरणीसह (Sowing) खरिपाची व त्यानंतर रब्बीची (Rabi Sowing) सारी कामे बैलांच्या साह्यानेच करण्याचे काम बीड जिल्ह्यातील महाजनवाडीचे जगदाळे कुटुंब करतात. चार ट्रॅक्टर आणि त्यावरील पेरणीसह मशागतीची सारे यंत्रे (Agriculture Machinery) असलेल्या या कुटुंबाकडे लहान मोठी जवळपास १०० जनावरे आहेत.

आताच युग यंत्र व तंत्रज्ञानाचे. त्याला शेतीही अपवाद नाही. परंतु यंत्र आणि तंत्रज्ञानाचा वापर नेमका किती करायचा, या विषयीची एक भूमिका महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबीयांनी घेतली आहे. गणेशराव व नामदेवराव जगदाळे यांनी सात भावंडांचे व जवळपास ४० जणांचे एकत्र कुटुंब आहे. त्यांच्याकडे जवळपास २०७ एकर शेती आहे. या शेतीत खरिपातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, तीळ, भगर, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, कपाशी, टोमॅटो, झेंडू, कांदा यांसह रब्बीत ज्वारीचे मुख्य पीक घेतले जाते. या कुटुंबाकडे शेतीच्या सर्व कामांसाठी चार बैलजोड्या आहेत.

Agriculture
BBF Technology : जादा पावसातही बीबीएफवरील लागवडीची पिके जोमदार

पूर्वीपासून बैलांच्या साह्याने शेती करण्याचे काम जगदाळे बंधू करत आले. परंतु २०१८ व १९ च्या खरीप हंगामात मात्र या कुटुंबीयांनी ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीच्या मशागतीसह पेरणी व इतर कामे करण्याचा प्रयत्न केला. परंतु पेरणीनंतर कोळपणी व खुरपणीसह इतर कामांच्या वेळी जमीन निबर येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या शेती कसण्याच्या तंत्रात बदल केला. ट्रॅक्टरऐवजी बैलांच्या साह्यानेच पेरणी करण्याचा निर्णय घेतला. फक्त उन्हाळ्यात नांगरणी, मोगडणी ट्रॅक्टरने करायची. त्यानंतर सारी कामे बैलांच्या साह्यानेच करून यंत्र व तंत्रज्ञानाच्या युगात बैलाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न जगदाळे कुटुंबीय करीत आहे.

Agriculture
Fisheries Technology : नव्या मत्स्यपालन तंत्रज्ञानामुळे वाढले उत्पन्न

‘‘एका दिवशी जवळपास नऊ ते दहा एकर जमीन बैलाच्या साह्याने पेरली जाते. साधारणतः खरिपात व रब्बीत दहा दिवसांत पेरणीचे मुख्य काम आटोपते,’’ असे नामदेवराव जगदाळे म्हणाले.

‘‘पेरणीनंतर दोन्ही हंगामांत सर्वच पिकांत आंतरमशागतीची कामे बैलांच्या साह्यानेच केली जातात. एकत्र कुटुंबाच्या शेतीपैकी ५० ते ६० एकर शेती रब्बीत ज्वारी पीक घेण्यासाठी खरिपात नापेर ठेवली जाते. त्यात उगवणारे गवत बैलांच्या साह्याने सतत मशागत करून जागीच संपविण्याचे तंत्रही अवलंबतात. याशिवाय करडी व जवसाचेही पीक रब्बीत ते घेतात. यंदाच्या खरिपात जवळपास ३० एकरांवर सोयाबीन, १५ एकरांवर तूर, साडेचार एकरांवर मूग, साडेसात एकरांवर उडीद, पाच एकर तीळ, साडेचार एकर भगर, दोन एकर मिरची, साडेतीन एकर ढोबळी मिरची, दोन एकर टोमॅटो, दोन एकर झेंडू, १५ एकरांवर कपाशीची लागवड केली आहे,’’ असे नामदेवराव जगदाळे म्हणाले.

थोडक्यात महत्त्वाचे...

- फक्त उन्हाळ्यात नांगरणी, मोगडणी ट्रॅक्टरने

- खरिपातील सारी कामे बैलाच्या साह्यानेच

- यंत्र व तंत्रज्ञानाच्या युगात बैलाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न

- मूग, उडीद, सोयाबीन तीळ, भगर, ज्वारीची १८ इंचांवर पेरणी

- तुरीची ६ बाय १ फूट अंतरावर लागवड

बैलांच्या साह्याने पेरणी व त्यानंतरची आंतरमशागत केल्याने शेतात उगवणारे तण जागीच संपून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. शिवाय जमीन मऊ राहते. पीकही जोमदार राहते, हा आमचा अनुभव आहे. पेरणीनंतर आंतरमशागतीची कामे ट्रॅक्टरच्या साह्याने करणे शक्य होत नाही.
नामदेवराव जगदाळे, शेतकरी, महाजनवाडी, जि. बीड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com