Anjangaon Surji APMC: अंजनगावसूर्जी बाजार समिती सभापती, प्रभारी सचिवावर गुन्हा

Audit Irregularities: बाजार समितीच्या माजी सचिवाचा मोबाईल हिसकावत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सभापतीसह प्रभारी सचिव, संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
Market Committee
Market CommitteeAgrowon
Published on
Updated on

Amravati News: बाजार समितीच्या माजी सचिवाचा मोबाईल हिसकावत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सभापतीसह प्रभारी सचिव, संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे संबंधित माजी सचिवाच्या कार्यकाळातील गैरव्यवहाराची चौकशी सुरू असल्याने त्या आकसातून ही तक्रार केल्याचा आरोप अंजनगावसूर्जी बाजार समितीच्या संचालक मंडळाने केला आहे. 

अंजनगावसूर्जी बाजार समितीत २०२३ मध्ये सध्याच्या संचालक मंडळाने पदभार स्वीकारला. त्यावेळी अंकेक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) व ताळेबंदाची पडताळणी केली असता त्यात मोठ्या रक्‍कमेची तफावत आढळून आल्याचा दावा सभापती जयंत साबळे यांनी केला. त्यामुळेच सुरुवातीला सभापती व त्यानंतर संचालक शंकर चोरे यांच्या माध्यमातून तत्कालीन सचिव गजानन नवघरे (वय ४९) यांच्या कार्यकाळातील व्यवहाराच्या चौकशीस सुरुवात करण्यात आली.

Market Committee
Manmad Market Committee : मनमाड बाजार समितीत कर्मचारी आक्रमक

संबंधित सचिवाला या संदर्भाने नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर लवकरच या प्रकरणात जबाब देखील नोंदविण्यात येतील. हे सारे सुरू असतानाच बाजार समितीचे माजी सचिव गजानन नवघरे यांनी सभापती जयंत साबळे व प्रभारी सचिव अमर साबळे, संचालिका पूनम पोटे यांचे पती अमोल पोटे तसेच संचालक शंकरराव चोरे यांनी त्यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. 

Market Committee
Pune Market Committee: पुणे बाजार समितीमध्ये दप्तर तपासणीला वेग

या विषयी त्यांनी अंजनगावसूर्जी पोलिसांत तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी चारही जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल जप्त केल्यानंतर त्याचे स्क्रीन लॉक उघडण्यासोबतच जप्ती पंचनाम्यावर सही करण्यासाठी देखील उभयतांनी दबाव टाकल्याचे देखील तक्रारीत नमूद आहे. बाजार समितीत घडलेल्या या घटनेने सर्वदूर एकच खळबळ उडाली आहे.

तत्कालीन सचिव गजानन नवघरे हे विरोधकांना बाजार समिती संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज पुरवीत होते. त्यांच्या हस्ताक्षरातील काही दस्तऐवज जप्त करण्यात आले. त्यांनी स्कॅन करून काही दस्तऐवज विरोधकांना व्हॉटसॲप केले. त्यामुळे मोबाईल रीतसर प्रक्रियेद्वारे जप्त करण्यात आला, असे सभापती जयंत साबळे यांनी सांगितले. 

२०१६ रोजी नियुक्‍त सचिव गजानन नवघरे यांनी अवघ्या दहा वर्षांच्या काळात मोठी माया जमविली आहे. त्यांच्या कार्यकाळातील ताळेबंद आणि बॅंक खात्यातील शिल्लक रक्‍कम जुळत नाही. अंकेक्षण अहवालात देखील त्यांच्या गैरव्यवहाराविषयी अनेक खुलासे आहेत. या प्रकरणात त्यांच्या चौकशीला सुरुवात केल्याने खोटी तक्रार दाखल करण्यात आली. 
- जयंत साबळे, सभापती, बाजार समिती, अंजनगावसूर्जी, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com