Pune Market Committee: पुणे बाजार समितीमध्ये दप्तर तपासणीला वेग

Market News: पुणे बाजार समितीमध्ये नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर दप्तर तपासणीने वेग घेतला आहे. जुने अहवाल अद्याप गुलदस्त्यात असतानाच पुन्हा एकदा सेस चोरी प्रकरणे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Pune Market Committee
Pune Market CommitteeAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे बाजार समितीवर संचालक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत आडत्यांवर वचक बसविण्यासाठी सुरू केलेल्या दप्तर तपासणीमधील अहवाल गुलदस्त्यात असताना, आता पुन्हा एकदा विभाग प्रमुखांच्या नव्याने झालेल्या नियुक्त्यांनंतर दप्तर तपासणीने वेग घेतला आहे. या दप्तर तपासणीमधून खरोखरच सेस चोरी उघड होणार की, तपासणी फार्स ठरणार? हे लवकरच समोर येणार आहे.

बाजार समितीने काही वर्षांपूर्वी दप्तर तपासणी केली होती. त्यामध्ये अनेकांनी शेतकरी, खरेदीदारांची कोट्यवधींची लूट झाल्याचे समोर आले होते.त्यामध्ये ८० अडत्यांची दप्तर तपासणी केली होती. त्यामध्ये ३६ अडते दोषी आढळले होते. मात्र यांच्यावर कोणती कारवाई केली. सेस चोरी करणाऱ्या कोणत्या अडत्यांकडून चोरीची वसुली केली.

Pune Market Committee
Pune Market Cess Scam: पुणे बाजार समितीत सेस चोरीचा मोठा गैरप्रकार उघड

हा अहवाल गुलदस्त्यात असताना, आता पुन्हा एकदा समितीने तरकारी, फळे, कांदा-बटाटा विभागांसह भुसार बाजारातील अडत्यांची दप्तर तपासणी सुरू केली आहे. नुकतेच बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पथकाने अचानक एका अडत्याचे दप्तर ताब्यात घेतले आहे. यामुळे आता सेस बुडवेगीरी करणाऱ्या आडत्यांचे धाबे दणाणले आहेत. 

Pune Market Committee
Pune Market Committee : पुणे बाजार समितीचा पुनर्विकास की, स्थलांतर?

दप्तर तपासणी हा नियमित कामकाजाचा भाग असल्याचे सांगत सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी बाजार फी चुकवेगिरीत संशयास्पद व्यवहार आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. दोषी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

दप्तर तपासणी फार्स आणि अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे?

दप्तर तपासणी हा नियमित कामकाजाचा भाग असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले, तरी दप्तर तपासणी हा केवळ फार्स असून, अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे करण्याचा धंदा असल्याचे ज्येष्ठ आडतदारांचे म्हणणे आहे. नुकताच आंबा हंगाम संपला असून, आंब्याची सेस चोरी समोर आणण्याचे प्रयत्न असल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com