Dr. Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Former PM Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहनसिंह यांना गुरुवारी संध्याकाळी ८ वाजता श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉ. मनमोहन सिंह यांनी उपचारादरम्यान एम्स रुग्णालयातच ९.५१ मिनिटांनी अखरेचा श्वास घेतला.
Former PM Dr. Manmohan Singh
Former PM Dr. Manmohan SinghAgrowon
Published on
Updated on

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. डॉ. सिंह यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना गुरुवारी (ता.२६) रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. डॉ. मनमोहनसिंह यांना गुरुवारी संध्याकाळी ८ वाजता श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉ. मनमोहन सिंह यांनी उपचारादरम्यान एम्स रुग्णालयातच ९.५१ मिनिटांनी अखरेचा श्वास घेतला. . डॉ. मनमोहन सिंह यांनी २००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या काळात देशाची पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली. देशातील प्रख्यात अर्थतज्ञ अशी त्यांची ख्याती होती.

डॉ. मनमोहन सिंह यांचा २६ सप्टेंबर १९३२ साली पंजाब प्रांतात जन्म झाला. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पी.एचडीचं शिक्षण पूर्ण केलं. तर ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून त्यांना डी.फिल मिळालं. डॉ. मनमोहन सिंह काही काळ पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक होते.

Former PM Dr. Manmohan Singh
Farmer Double Income : मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी केले; डॉ. मनमोहन सिंग यांची मोदींवर टीका!

१९७१ साली डॉ. मनमोहन सिंह वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार राहिले. तर १९७२ साली अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९८२ ते १९८५ दरम्यान ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते. तसेच १९८५ ते १९८७ मध्ये देशाच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. १९९१ साली देशाचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंह यांनी काम पाहिले. अर्थमंत्री असताना महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा केल्या. परिणामी देशाने जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण धोरण स्वीकारले. देशातील आर्थिक सुधारणामध्ये डॉ. मनमोहन सिंह यांचं भरीव योगदान राहिलं. त्यासाठी डॉ. मनमोहन सिंह यांना पद्म विभूषण सन्मानाने गौरविण्यात आले.

डॉ. मनमोहन सिंह १९९१ साली आसाममधून राज्यसभेचे खासदार झाले. १९९५, २००१, २००७, २०१३ या काळात ते राज्यसभेवर खासदार होते. दरम्यान डॉ. मनमोहन सिंह यांनी १९९९ साली लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. १९९८ ते २००४ दरम्यान राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी डॉ. मनमोहन सिंह यांना २००९ साली मिळाली.

डॉ. मनमोहन सिंह यांचा सन्मान

डॉ. मनमोहनसिंह यांच्या भरीव योगदानामुळे त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. १९८७ साली पद्म विभूषण, सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणून आशिया मनी अवॉर्ड, युरो मनी अवॉर्ड या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत शोक व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांनी लिहिले, "भारताने आपल्या सर्वात प्रतिष्ठित नेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, डॉ. मनमोहन सिंग जी. नम्र उत्पत्तीतून उठून, तो एक सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ बनला. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले." असं मोदी यांनी एक्सवर ट्विट केलं आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला. शरद पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. पवारांनी लिहिलं, "भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॅा. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॅा मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो!"

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाजुर्गन खरगे कर्नाटकातील बेळगावहून दिल्लीत परतले आहेत. तर खा. प्रियंका गांधी, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि इतर वरिष्ठ नेते एम्स दिल्लीत पोहोचले आहेत. काही वेळात सोनिया गांधीही येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com