Farmer Double Income : मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी केले; डॉ. मनमोहन सिंग यांची मोदींवर टीका!

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विद्यमान नरेंद्र मोदी सरकारची मागील १० वर्षातील कामगिरी निराशजनक राहिल्याचं मत व्यक्त केलं. तसेच केंद्र सरकारच्या शेती धोरणांवरूनही डॉ.सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Dr. Manmohan singh
Dr. Manmohan singh Agrowon

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विद्यमान नरेंद्र मोदी सरकारची मागील १० वर्षातील कामगिरी निराशजनक राहिल्याचं मत व्यक्त केलं. तसेच केंद्र सरकारच्या शेती धोरणांवरूनही डॉ.सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलन, दुप्पट उत्पन्न यावरही टिपणी केली. लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग यांनी पंजाबच्या नागरिकांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात देशातील लोकशाही, संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी निरंकुश सत्ताधाऱ्यांना पायउतार करण्याचं आवाहन डॉ. सिंग यांनी मतदारांना केलं आहे.

डॉ. सिंग यांनी तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाबद्दल पत्रात भाष्य केलं आहे. त्यासोबतच भाजपने शेतकऱ्यांची बदनामी केल्याचा आरोपही सिंग यांनी केला आहे. डॉ. सिंग लिहिले , "पंजाबमधील शेतकरी तीन कृषी कायद्यांना विरोध करत होते. त्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. परंतु तरीही भाजप सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही. उलट मागच्या दहा वर्षात पंजाब आणि पंजाबियतला बदनाम करणीयचा एकही संधी भाजपने सोडली नाही. शेतकऱ्यांवर लाठीमार आणि रबरी गोळ्या चालवून सरकारचे समाधान झाले नाही. म्हणून संसदेत शेतकऱ्यांना 'आंदोलनजीवी' आणि 'परजीवी' असं संबोधलं गेलं. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे ७५० शेतकरी आंदोलनात शहिद झाले. त्यांची मागणी फक्त एवढीच होती की, कृषी कायदे त्यांच्या लादू नका." असंही डॉ सिंग यांनी लिहिलं आहे.

डॉ. सिंग यांनी पुढे लिहिले की, "मोदीजींनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा आश्वासन दिले होते. परंतु मागील १० वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी केले आहे." या पत्रात खत आणि इंधनासह कृषी निविष्ठाच्या किमतीतील वाढ आणि आयात-निर्यात धोरणावरही नाराजी व्यक्त केली. तसेच युपीए सरकारने देशातील ३.७३ कोटी शेतकऱ्यांचं ७२ हजार कोटी रुपये कर्जमाफ केल्याचंही सांगत हमीभावातील वाढ, उत्पादनातील वाढ आणि निर्यात धोरणांना दिलेलं प्रोत्साहन यावरही टिपणी केली.

दरम्यान, कॉँग्रेसनं जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी 'किसान न्याय' अंतर्गत शेतकऱ्यांना ५ प्रकारची हमी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली, अशी टीका या पत्रात डॉ सिंग यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com