Dindori Lok Sabaha : दिंडोरीतून माजी खासदार चव्हाण अपक्ष उमेदवारीवर ठाम

Lok Sabha Election 2024 : दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्याने महायुतीचीही डोकेदुखी वाढली.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Agrowon
Published on
Updated on

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची आघाडीतील घटक पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट जे. पी. गावित शक्यता आहे. पक्षाने उमेदवारी मागितली. न मिळाल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्याने महायुतीचीही डोकेदुखी वाढली.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत माकप आघाडीबरोबर असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

Lok Sabha Election 2024
Hatkanangle Lok sabha : भारतीय जवान किसान पार्टीकडून रघुनाथ पाटील हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात

मात्र आता माकपचे माजी आमदार जे. पी. गावित हे दिंडोरीतून लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांनी शुक्रवारी (ता. १९) दिंडोरीत पक्षाचा मेळावा घेतला. यात आघाडीने हा मतदार संघ माकपला सोडावा, अशी मागणी करणारा ठराव केला.

आघाडीने मित्रपक्षाचा विचार न केल्यास माकप उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यामुळे दिंडोरीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याच्या मार्गावर आहे. गावित यांच्या भूमिकेमुळे आघाडीचे उमेदवार भगरे यांच्या अडचणी वाढतील.

Lok Sabha Election 2024
Vidarbha Lok sabha 2024 : विदर्भात धाकधूक वाढली; दुपारपर्यंत ४४.१२ टक्के मतदान

...तर होऊ शकते चौरंगी लढत

महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे माजी खासदार चव्हाण यांनीही अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे जाहीर करीत, त्यावर ठाम राहणार असल्याचे सांगितले.

तसेच चव्हाण यांनी कळवण येथे डॉ. भारती पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत पाच वर्षांत माझी आठवण झाली नाही, आता अडचणीत आल्यावरच माझी आठवण झाली का, असा सवाल केला. त्यामुळे महायुतीपुढेही पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. गावित व चव्हाण यांच्या भूमिकेमुळे दिंडोरी लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com